घरमुंबईमनसेच्या इच्छुकांचा सोमवारी मेळावा; राज ठाकरे साधणार संवाद

मनसेच्या इच्छुकांचा सोमवारी मेळावा; राज ठाकरे साधणार संवाद

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० सप्टेंबरला वांद्रे येथील एमआयजी येथे मनसेच्या इच्छुकांचा मेळावा घेणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी मनसेच्या इच्छुकांचा मेळावा घेणार आहेत. वांद्रे येथील एमआयजी येथे मनसेचा मेळावा सकाळी पार पडणार असून यावेळी राज ठाकरे सर्व इच्छुक उमेदवारांसोबत साधणार संवाद आहेत. दरम्यान, या मेळाव्यात राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची रूपरेषा ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहे.

या भागात मनसे आपला उमेदवार लढवणार

लोकसभा निवडणुकीमध्ये ‘लाव रे तो’ व्हिडिओ म्हणणार्‍या राज ठाकरेंच्या मनामध्ये विधानसभा निवडणूक लढवावी की, लढू नये, असा संभ्रम सुरू आहे. मात्र, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राज ठाकरे निवडणुकीत रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक लढू नये, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत होते. मात्र, काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर राज ठाकरे यांचे मन बदलले आहे. दरम्यान, मनसेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय आणि ५० ते ६० जागा लढवू शकतील, असे समजते आहे. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पंढरपूर, वणी येथील जागांचा समावेश असू शकतो. तर मुंबईतील माहीम, विक्रोळी या भागात देखील मनसे आपला उमेदवार देणार आहे.

- Advertisement -

काँग्रेस-राष्ट्रवादीची मिळणार मदत?

काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत मनसेने आघाडीत यावे, अशी काही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती; तर काहींचा विरोध होता. मात्र, काँग्रेस सोबत गेलो तर मनसेला आपली पारंपरिक मते देखील नाहीत, असे मत मनसेच्या पदाधिकार्‍यांचे आहे. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत जिथे मनसेचा उमेदवार काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामुळे थोड्या फरकाने पराभूत झाला अशा काही जागांवर आघाडीने उमेदवार न देता मनसेला मदत करावी,अशी मागणी मनसेकडून होत आहे. एवढच नाही तर आघाडीत देखील यावर सहमत असल्याचे समजत आहे.


हेही वाचा – सेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेवर नजरा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -