घरमुंबईयंदाही गणेशोत्सव बिनधास्त साजरा करा - राज ठाकरे

यंदाही गणेशोत्सव बिनधास्त साजरा करा – राज ठाकरे

Subscribe

यावर्षी दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मुंबई महापालिकेकडून मंडपासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

गेल्या काही महिन्यांपासून विविध मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले असून, आता त्यांनी गणेशोत्सव वादात देखील उडी घेतली आहे. ‘प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांना का आडकाठी केली जाते?’, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्यावर्षी जसा गणेशोत्सव साजरा केला तसा यावर्षी देखील साजरा करा, असे आवाहन गणेशोत्सव मंडळांना केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबईतील काही गणेश मंडळांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सर्व मंडळांना यावर्षीही उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचेही आवाहन केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

मुंबई महापालिकेने हायकोर्टाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, खेतवाडी या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबईच्या खेतवाडी येथील गणेश मंडळांना भेट दिली.

- Advertisement -

काय म्हणाले राज ठाकरे

या विषयावर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, ‘सर्व गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गिरगावमध्ये गेल्या ८० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र आत्ताच याबाबत तक्रार आली, गणेशोत्सव वर्षातून एकदा असून दहा दिवसाचा सण असतो’. त्यासाठी का आडकाठी केली जाते? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी याविषयावर बोलताना मुस्लीम समाजालाही टार्गेट केले. ‘मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो?’, असे राज ठाकरे म्हटले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -