घरमुंबईभिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद

Subscribe

भिवंडीच्या राजीव गांधी उड्डानपुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. धोकादायक झालेल्या या पुलाच्या दुरुस्तिसाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करुन देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

कोलकात्याच्या माजेरहाट पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असतानाचा महाराष्ट्रातल्या भिवंडीमधील राजीव गांधी उड्डाण पुलाचा स्लॅब अचानक कोसळल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतिही जिवितहानी झाली नाही. मात्र सध्या या पुलावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. या घटनेमध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

- Advertisement -

प्रशासनाचा हलगर्जीपणा

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुल हा धोकादायक असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या पुलाची दुरुस्थी करणे आवश्यक होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ही गोष्ट गांभिर्याने न घेता त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ही घटना घडली असल्याच आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. दहिहंडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनी देखील याच पुलावरून प्रवास केला असल्याचे सांगितले जात आहे.

१२ वर्षातच पुल बनला धोकादायक

भिवंडीचा राजीव गांधी उड्डान पूल ३० एप्रिल २००६ साली बांधण्यात आला होता. १२ वर्षातच हा पुल धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पुलावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बुधवारी दुपारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडल्यामुळे आता स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या घटनेनंतर हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -