घरमुंबईपालिकेने पूरग्रस्त भागात स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांना दोन महिन्याचं वेतन द्यावं -...

पालिकेने पूरग्रस्त भागात स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांना दोन महिन्याचं वेतन द्यावं – रामदास आठवले

Subscribe

पूरग्रस्त आणि दरडग्रस्त महाड, चिपळूण, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी जाऊन जीवाची पर्वा न करता तिथे आठ-दहा दिवस स्वच्छतेचे चांगले काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला याचा मला निश्चितच आनंद आहे. अशा या सफाई कामगारांना मुंबई महानगरपालिकेने एक नव्हे तर दोन महिन्याचे अतिरिक्त वेतन द्यावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसफल्य योजनेत कायम स्वरूपी घर देण्यात यावे अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सफाई कामगारांचा स्वच्छता सैनिक योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करताना केली.

कोकणात २२ जुलै रोजी अतिवृष्टी महापुरात महाड, चिपळूण, सांगली, कोल्हापूर या शहराचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. या शहराचे जनजीवन पूर्वपदावर आणणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोलाचे आहे. कोरोनाच्या काळात मानवावर आलेले हे खुपच मोठे संकट आहे, एकप्रकारे युद्धच म्हणावे लागेल, या संकट काळात या युद्धात सैनिक म्हणून आपलं कर्तव्य पार पडणाऱ्या ३०० सफाई कामगारांचा तसेच महाडमध्ये कामगारांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचे काम केले ते पालिकेचे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांचा म्युनिसिपल मजदूर संघाच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांच्या हस्ते स्वच्छता सैनिक योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्वतः रामदास आठवले हे होते. म्युनिसिपल मजदूर युनियनचे ते अध्यक्षही आहेत. यावेळी पालिकेचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

आठवले यांनी, म्युनिसिपल कामगार संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी युनियनच्यावतीने एक चांगला कार्यक्रम घडवून आणला.ते अभ्यासू व कामसू आहेत. आपण साऱ्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन चांगले काम करून आलात आपला सन्मान झाला पाहिजे असे जाधव यांना वाटत होते. त्या प्रमाणे हा सन्मान होतोय. सुभाष दळवी यांचा सन्मान माझ्या हस्ते झाला याचा मला विशेष आनंद झाला असल्याचे सांगून ना. रामदास आठवले यांनी यावेळी स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे ही काम आपण केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे व ते जगवले पाहिजे.कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासली आपल्याला तेव्हा तो कमी पडला. तेव्हा झाडाचे महत्व साऱ्यांच्या लक्षात आले.नाशिक व पालघर मध्ये ऑक्सिजन लिकेज मुळे आग लागल्याने कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची आठवण करून त्यासाठीच आपण गेल्यावर्षी गो कोरोना गो ची घोषणा केली होती.पण त्याकडे तेव्हा दुर्लक्ष करण्यात आले अशी खंत ही ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी सांगितले की, आपण सुभाष दळवी त्यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त व दरडग्रस्त भागात जाऊन चांगले काम करून आलात त्याबद्दल तुमचे कौतुक करण्यासाठी मी आलो आहे.आपण तिथे साचलेल्या चिखलात झोकून देऊन सफसफाईचे काम केले त्या बद्दलही त्यांनी सफाई कामगारांचे रिपब्लिकन पक्षातर्फे आभार मानले. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे प्रश्न रामदास आठवले तडीस नेतील असा विश्वासही गौतम सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांनी सर्व कामगारांच्यावतीने सत्काराला उत्तर देताना, आम्ही महाड, चिपळूण येथे केलेल्या कामाचे युनियनचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी या समारंभात कौतुक करून सन्मानित केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. व ज्या महाडमध्ये ज्या भूमीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पाय लागले.तिथे त्यांनी पाण्यासाठी जो संघर्ष करून क्रांती केली त्या क्रांतिचे प्रतीक असलेल्या क्रांती स्तंभाने आम्हाला तिथे तळमळीने काम करण्याची प्रेरणा दिली.हा सन्मान त्या प्रेरणेचा आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी पालिकेचे सहाय्यक अभियंता पाटील, माजी उपप्रमुख अभियंता दिलीप थोरावडे, तसेच पगारे, प्रविण मोरे, तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -