घरमुंबईराणा दाम्पत्याने कोर्टाच्या नोटिशीला दिले उत्तर, अटींचा भंग झाला नसल्याचा केला दावा

राणा दाम्पत्याने कोर्टाच्या नोटिशीला दिले उत्तर, अटींचा भंग झाला नसल्याचा केला दावा

Subscribe

राणा दाम्पत्याने आज कोर्टाच्या नोटिशीला उत्तर दिले. सत्र न्यायालयाने जामीन देताना दिलेल्या अटींचा भंग झाला नसल्याचा दाव आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आज कोर्टात केला. राणा दाम्पत्याने जामीनाच्या अटींचा भंग केला असून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावण्यात आली होती.

राणा दाम्पत्याने कोर्टात सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्याच्या परवानगीचा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कोर्टाने मंजूर केला असून पुढील सुनावणी 15 जूनला होणार आहे. राणा दाम्पत्याने माध्यमांशी संवाद साधताना तुरुंगात असताना 12 दिवस सहन कराव्या लागलेल्या यातना, ओढावलेला प्रसंग सांगितला. या प्रकरणाशी कोणत्याही मुद्यावर भाष्य केले नाही. त्यामुळे कोर्टाच्या कोणत्याही अटींचा भंग झाला नसल्याचा दावा राणा दाम्पत्याने केला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज रद्द व्हावा यासाठी अर्ज केला होता. या अर्जात दोन्ही आरोपींनी जामीन अटींचा भंग केला आहे. राणा यांनी माध्यमांशी बोलताना हनुमान चालिसेसाठी 14 दिवसच काय 14 वर्षांचा तुरुंगवासही सहन करण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते. मला तुरुंगात डांबल्याचा परिणाम तुम्हाला (उद्धव ठाकरे) सहन करावा लागणार आहे. राम आणि हनुमान यांना विरोध केल्यास काय होऊ शकते हे तुम्हाला कळेल. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही ठिकाणांहून निवडणूक लढवावी, मी तुमच्यासमोर निवडणुकीस उभी राहणार असल्याचे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले होते. या वक्तव्यांमुळे जामीन अटींचा भंग होत असल्याची तक्रार सरकारने कोर्टासमोर केली. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करून त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -