घरताज्या घडामोडीऑनलाइन तिकिटावर करता येणार राणी बागेची सफर

ऑनलाइन तिकिटावर करता येणार राणी बागेची सफर

Subscribe

मुंबई महापालिका प्रशासनाने भायखळा येथील राणी बागेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने शुक्रवारी 'ऑनलाइन' तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली. या प्रणालीचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ.संजीव कुमार यांच्या हस्ते राणी बागेतील थ्रीडी प्रेक्षागृहात करण्यात आला.

मुंबई : मुंबईतील खास पर्यटन स्थळांपैकी एक व बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या भायखळा येथील राणी बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) आता भर उन्हात रांग न लावता ऑफिस अथवा घरबसल्या ‘ऑनलाइन’ तिकीट काढून आरामात सहकुटुंब जाऊन प्राणी सफरीचा आनंद लुटू शकता. त्यामुळे मुंबईकरांची वेळेची बचत होणार असून पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Rani Baghe tour can be done on online ticket)

मुंबई महापालिका प्रशासनाने भायखळा येथील राणी बागेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने शुक्रवारी ‘ऑनलाइन’ तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली. या प्रणालीचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ.संजीव कुमार यांच्या हस्ते राणी बागेतील थ्रीडी प्रेक्षागृहात करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी उपआयुक्‍त (उद्याने) किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि इतर मान्‍यवर यावेळी उपस्थित होते.

राणी बाग प्राणी संग्रहालयाचा इतिहास

- Advertisement -

मुंबई महापालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वाश्रमीचे व्हिक्टोरिया गार्डन) चे उद्घाटन लेडी कॅथरीन फ्रिअर यांच्या हस्ते १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळा येथे करण्यात आले होते. हे उद्यान महापालिकेकडे सुपूर्द झाल्‍यानंतर एक सार्वजनिक उद्यान म्हणून त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी महापालिकेने स्‍वीकारली. तेव्हापासून आजवर सातत्याने हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनसामान्‍यांच्‍या विशेषतः बच्चे कंपनीच्या विशेष पसंतीचे ठिकाण ठरले आहे. गेल्या पाच – सहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात ७० टक्केपेक्षाही जास्त कामे पार पडली असून तिसऱ्या व अंतिम टप्प्याची कामे सुरू आहेत.

या ठिकाणी विदेशातून पेंग्विन, विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनी देखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱया पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. या प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव मागील वर्षभर निरनिराळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

यामध्ये, १६० वर्षपूर्तीनिमित्‍त शतकोत्तर हीरक महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण, पर्यटकांसाठी प्राणिसंग्रहालयात आकर्षक आसने/ बैठक व्यवस्था, विद्यार्थ्‍यांसाठी हेरिटेज वॉक, गांडूळखत विक्री तसेच प्राणिसंग्रहालयाच्‍या विविध समाजमाध्यम (सोशल मीडिया) अॅपचे क्यूआर कोड प्रदर्शन यासारख्या काही उपक्रमांचा उल्लेख करता येईल.

राणी बागेची ऑनलाईन तिकिट यंत्रणा

राणी बागेत प्रवेश करण्यासाठी भर उन्हात रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागते.मात्र आता पालिकेने ऑनलाईन तिकिट यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे आता घरबसल्या अथवा ऑफिसमधूनही राणी बागेची तिकीट काढणे शक्य होणार आहे. या ऑनलाईन तिकिट प्रणालीचे शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्‍यात आले. त्‍यादृष्‍टीने पर्यटकांना अवगत करण्‍यासाठी परिसरात सर्वत्र क्यू आर कोडही प्रदर्शित करण्‍यात आले आहेत. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करुन बृहन्मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर पर्यटकांना ही तिकिट नोंदणी करता येईल.


हेही वाचा – कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वे सज्ज; अनेक गाड्या होणार रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -