घरमुंबईमुंबईत का वाढल्या आगीच्या घटना? कारण सापडलं!

मुंबईत का वाढल्या आगीच्या घटना? कारण सापडलं!

Subscribe

मुंबईमध्ये आगीच्या घटना का वाढल्या आहेत? याचं कारण सापडलं आहे. या घटना कमी व्हाव्यात यासाठी मुंबई महापालिकेने संबंधित यंत्रणेली ताकीद दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून मुंबईत आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईमध्ये दररोज आगीच्या घटना घडताना दिसत आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. एक आग शमत नाही, तेवढ्यात दुसरी आगीची घटना घडते. एकामागे एक अशा घटना दररोज आणि वारंवार घडत आहेत. या आगीच्या घटना का वाढल्या आहेत? याचं कारण आता सापडलं आहे. सदोष विद्युत जोडणीमुळे मुंबईत आगीच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांत बहुतांश ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा – आगीचे सत्र सुरुच; पनवेलच्या वैदू नगर झोपडपट्टीला भीषण आग

- Advertisement -

दहा वर्षाच ५५ हजार आगीच्या घटना

मुंबईत गेल्या दहा वर्षात ५५ हजार आगीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी ३६ हजार आगीच्या घटना या शॉर्ट सर्किटमुळे घडल्या आहेत. सदोष वायरिंगमुळे ठिणगी पडून पडून गॅस सिलेंडरचा स्फोट होतो आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब आणि आजूबाजूचं कुटुंब दगावतं. गेल्या वर्षभरात आगीच्या मोठ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याच्या किंवा गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याच्या बऱ्याच घटना मुंबईमध्ये घडल्या आहेत. या घटनांना आळा घालता यावा, यासाठी आपत्कालीन कायदा २००५ कलम ३० अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाय किंवा खबरदारी घेण्यासाठी संबंधित यंत्रणेला ताकीद देण्याचा अधिकार मुंबई महापालिकेला आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व वीज आणि गॅस वितरण कंपन्यांना नियमित तपासणीची सूचना दिली आहे.


हेही वाचा – भिवंडीत उजागर डाईंग कंपनीला भीषण आग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -