घरदेश-विदेश'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ठक-ठक गँगने लुटले

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला ठक-ठक गँगने लुटले

Subscribe

माजी क्रिकेटर मनोज प्रभाकरच्या पत्नी फरहीन प्रभाकरला भर रस्त्यात लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. 'ठक-ठक गँग'ने ही लुट केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसाढवळ्या लोकांना लुबाडण्यात येत असल्याच्या घटना दिल्लीत सर्रास घडत आहेत. सामान्य लोकांनाच नाही तर बॉलिवूड कलाकारांनाही लुटले. माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर याची पत्नी फरहीन प्रभाकरला ठक – ठक गँगने भररस्त्यात लुटले आहे. या प्रकरणी फरहीनने दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. भर रस्त्यात या गँगकडून लुटले जात असताना कोणीच तिच्या मदतीला आले नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. ठक-ठक गँगचे सदस्य गाडी चालकाला आपल्या बोलण्यामध्ये व्यस्त करून त्याच्या गाडीतील मौल्यवान सामान चोरी करतात. या घटनेत फरहीनचा मोबाईल आणि पाकिट चोरीला गेले आहेत.

अशी आहे ठक-ठक गँगची चोरीची स्टाईल

दिल्लीतील काही परिसरांमध्ये ठक-ठक गँगची दहशत आहे. या गँगमधील भामटे गाडीच्या काचेवर ठोकतात. गाडीची काच खाली केली की भांडण्यास सुरुवात करतात. भांडण्यात व्यस्त असताना गँगमधील दुसरा भामटा गाडीतील सामान घेऊन पसार होतो. अशापद्धतीने या गँगने अनेकवेळा चोरी केली आहे.

- Advertisement -

कसा घडला प्रकार

फरहीन या आपल्या गाडीतून जात होत्या. तेव्हा एकाने त्यांच्या गाडीच्या काचेवर ठोकले. त्यांना वाटले आपल्या गाडीने कोणाला धडक दिली आहे म्हणून त्यांनी गाडीची काच खाली केली. काच खाली करताच या भामट्याने त्यांच्या डोक्यावर वार केला आणि गाडीतील मोबाईल, पाकिट घेऊन पसार झाले. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न फरहीनने केला मात्र अस्तमाचा त्रास असल्यामुळे त्या जास्त लांब पाठलाग करू शकल्या नाहीत. त्यांना रस्त्यात चक्कर आली आणि त्या बेशुद्ध झाल्या होत्या. या पाकिटात १६ हजार रुपयांची रोख, महत्वाचे कागदपत्र आणि मोबाईल फोनचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -