घरCORONA UPDATEपनवेलमध्ये आणखी ५ खासगी कोविड रुग्णालयांना मान्यता

पनवेलमध्ये आणखी ५ खासगी कोविड रुग्णालयांना मान्यता

Subscribe

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आणखी ५ खासगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची मान्यता दिल्याची माहिती महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. त्यामुळे कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध देणे सोयीचे ठरणार आहे. पनवेल मनपा हद्दीत कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणू (कोविड-१९) या संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी असणे गरजेचे आहे. जेणेकरून रूग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य आहे. याकरता खालील रुग्णालयांना खासगी कोविड १९ रूग्णांलय म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. या रुग्णालयात शासनाने निश्चित केलेल्या शुल्कामध्ये उपचार दिले जातील, असे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

पनवेलमध्ये नव्याने मान्यता देण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये पोलारिस हॉस्पिटल, १९/सी, सेक्टर -२०, खारघर, सुअस्थ हॉस्पिटल, प्लॉट नंबर-१, सेक्टर-२० रोडपाली/नवीन कळंबोली, सत्यम हॉस्पिटल, सेक्टर ३ ई, कळंबोली, सुश्रुत कोव्हिड-१९ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, कळंबोली सेक्टर-१, कळंबोली, निरामय हॉस्पिटल, प्लॉट नंबर-५ ए, सेक्टर-४, खारघर या पाच हॉस्पिटलचा समावेश असल्याची माहिती पनवेल महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. खासगी मान्यता प्राप्त हाॅस्पिटलमध्ये नागरिक कोविडकरता उपचार घेऊ शकतात, अशी माहिती उपायुक्त जनसंपर्क जमीर लेंगरेकर यांनी दिली. खारघर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये सध्यस्थीतीत ५० बेडसची व्यवस्था असल्याची माहिती निरामयचे वैद्यकीय संचालक डॉ. अमित थडानी यांनी दिली. खारघर येथील पोलोराईज हॉस्पिटलमध्ये ३१ बेडसची व्यवस्था आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -