घरमुंबईअनधिकृत पार्किंगच्या दंडात कपात; चार हजार रुपये आकारणार!

अनधिकृत पार्किंगच्या दंडात कपात; चार हजार रुपये आकारणार!

Subscribe

७ जुलै २०१९ पासून महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या निर्देशानुसार अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाईला सुरूवात करण्यात आली.

सार्वजनिक वाहनतळापासून ५०० मीटर त्याचप्रमाणे पाच प्रमुख रस्त्यांवर बस स्थानकापासून ५० मीटर अंतरावर अनधिकृत वाहने उभी केल्यास आतापर्यंत मुंबई महापालिका थेट ५ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारत असे. पण यापुढे हाच दंड अनुक्रमे ४ हजार रुपये आणि ८ हजार रुपये एवढा आकारण्यात येणार आहे. नुकतेच याबाबतचे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे.

कारवाईवर नागरिकांची तीव्र नाराजी

रस्त्यावर अनधिकृतपणे बिनदिक्कत वाहनं पार्क केली जातात. परिणामी वाहतुककोंडी होते. त्यामुळे ७ जुलै २०१९ पासून महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या निर्देशानुसार अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाईला सुरूवात करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात पार्क करण्यात आलेल्या वाहनांकडून ५ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत होता. या कारवाईवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

- Advertisement -

मुंबई वाहतूक प्राधिकरणाची देखील तक्रार

मुंबई वाहतूक प्राधिकरणाच्या सदस्यांनीसुद्धा कारवाईतील दंडाच्या रकमेत कपात करण्याची सूचना केली होती. त्यानुसार अनधिकृत पार्किंगमध्ये आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम ४ हजार रुपये करण्यात आली आहे. बस स्थानक परिसरात गाड्या उभ्या करणाऱ्यांवरही हा दंड लागू करण्यात येणार आहे.

हेही वाचा – अनधिकृत वाहनांवरील कारवाईच्या दंडाची रक्कम होणार कमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -