घरमुंबईस्वत:चाच आवाज झाला वैरी

स्वत:चाच आवाज झाला वैरी

Subscribe

व्यक्तीचा आवाज म्हणजे तिला मिळालेली नैसर्गिक देणगी म्हणतात. चांगल्या आवाजासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण हाच आवाज एखाद्या व्यक्तीला गोत्यात आणू शकतो. खोटं वाटतंय? रवी पुजारीच्या नावाने धमकी देणारा एक इस्टेट एजंट धर्मेश खंडागळे आपल्या आवाजामुळे पकडला गेला. त्याचा आवाजच त्याचा वैरी झाला.

व्यक्तीचा आवाज म्हणजे तिला मिळालेली नैसर्गिक देणगी म्हणतात. चांगल्या आवाजासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण हाच आवाज एखाद्या व्यक्तीला गोत्यात आणू शकतो. खोटं वाटतंय? रवी पुजारीच्या नावाने धमकी देणारा एक इस्टेट एजंट धर्मेश खंडागळे आपल्या आवाजामुळे पकडला गेला. त्याचा आवाजच त्याचा वैरी झाला. व्यवसायाने बिल्डर असलेल्या तक्रारदारांची सांताक्रुज येथे राहणार्‍या तक्रारदारांनी आठ वर्षांपूर्वी थेराकन जोसेफ आणि त्यांचा मुलगा हेसमंड जोसेफ यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांची तिथेच २६०० स्क्वेर फुट जागा होती. ही जागा विकासकामासाठी त्यांनी दोन्ही पिता-पुत्रांकडून घेतली होती. या जागेवर त्यांचे चार कच्च्या झोपड्या होत्या. त्यापैकी दोन झोपड्यामध्ये पिता-पुत्र तर दोन झोपड्यांमध्ये भाडेकरु राहत होते. या जागेवर बांधकाम करण्यापूर्वी त्यांच्यात एक करार झाला होता. यावेळी त्यांनी तिथे चार हजार स्क्वेर फुटची कमर्शियल जागा, दोन आलिशान फ्लॅट आणि ६० लाख रुपये देण्याचे ठरले होते. २९ डिसेंबर २०१० रोजी तसा त्यांचा करारही झाला होता.

झोपड्यांची जागा खाली न केल्याचा वाद

करारानंतर तिथे बांधकाम सुरु झाले, मात्र जोसेफ पिता-पुत्रांनी झोपड्यांची जागा खाली न केल्याने त्यांच्यात वाद सुरु झाला. प्रकरण कोर्टात गेले आणि बांधकामाला स्थगिती मिळाली होती. २१  डिसेंबरला तक्रारदारांना एका आंतरराष्ट्रीय क्रमाकावरुन फोन आला होता. आपण रवी पुजारी बोलत असून तुमच्यातील वाद मिटवून टाका आणि जोसेफ पिता-पुत्रांना दहा कोटी रुपये द्या, असे या व्यक्तीने सांगितले. याच व्यक्तीने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन तक्रारदारांना ५२  हून अधिक वेळा कॉल करुन दहा कोटी रुपयांची मागणी केली. तसेच चर्चेद्वारे प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला. रवी पुजारीकडून येणार्‍या धमक्यांना कंटाळून अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

- Advertisement -

वाकोला पोलिसांत खंडणीच्या गुन्ह्याची नोंद

याप्रकरणी वाकोला पोलिसांत खंडणीचा गुन्हा नोंद होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. हा तपास हाती येताच पोलिसांनी मिरारोड येथून धर्मेद्र खंडागळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत सतत केलेल्या प्रश्नांचा भडीमारानंतर धर्मेद्रने रवी पुजारीच्या नावाने आपण तक्रारदारांना धमकी देत होतो असे सांगितले. तो त्यांच्या परिचित असून त्याला संपूर्ण प्रकरणाची माहिती होती. त्यांच्यातील काही मिटींगमध्ये तो स्वत हजर होता. त्यामुळे त्याने रवी पुजारीच्या नावाने त्यांना धमकाविण्यास सुरु केली.

१२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

रवी पुजारीच्या नावाने सुरुवातीला तक्रारदार प्रचंड घाबरले होते, त्यामुळे त्यांनी चर्चेद्वारे हा वाद मिटविण्याची तयारी दर्शविली होती, याच गोष्टीचा धर्मेद्रने फायदा घेतला होता. त्याच्या कबुलीत हा प्रकार उघडकीस येताच त्याला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

आवाजच झाला वैरी

२१  डिसेंबर २०१७ रोजी तक्रारदारांना पहिल्या कॉल आला होता. त्यानंतर २० फेब्रुवारी २०१८ पर्यंत त्यांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन संबंधित व्यक्ती दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देत होता. आपण रवी पुजारी असल्याचे सांगून दहा कोटी रुपये देऊन प्रकरण मिटविण्याचा सल्ला देत होता. त्यामुळे त्यांनी सर्व कॉल रेकॉर्ड करुन एका पेन ड्राईव्हमध्ये ठेवले होते. एके दिवशी सहज म्हणून त्यांनी गुगलवर रवी पुजारीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्याशी बोलणारा व्यक्ती आणि गुगलवर रवी पुजारीचा आवाज दोन वेगवेगळ्या व्यक्तीचे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या दोन्ही आवाजाची टॅली करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना धमकी देणारा व्यक्ती रवी पुजारी नसल्याची पक्की खात्री झाली. त्यानंतर त्यांनी एप्रिल महिन्यांत पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करताना ५२  कॉलचा तपशील असलेला पेन ड्राईव्ह दिला होता.

गुन्ह्याचा पर्दाफाश

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मिटींगमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाची जबानी नोंदवून घेतली होती. यावेळी त्यांना हा आवाज ऐकविण्यात आला होता. यावेळी तानाजी सणस आणि रामदास बारस्कर यांनी तो आवाज धर्मेद्र खंडागळे याचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -