घरCORONA UPDATEवाडियातील परिचारिका पॉझिटिव्ह

वाडियातील परिचारिका पॉझिटिव्ह

Subscribe

वाडिया मॅटर्निटी हॉस्पीटलमधील परिचारिकेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यांची कोरोना तपासणी करुन त्यांना नायर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

वाडिया मॅटर्निटी हॉस्पीटलमधील परिचारिकेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची कोरोना तपासणी करुन नायर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कोरोना अहवालाबाबत समजल्यावर सर्वतौपरी मदत करण्यात आली असल्याचे वाडिया प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, बाधित परिचारिकेला दहा तास खोळंबून ठेवले असल्याचा आरोप वाडिया बचाव कृती समितीकडून करण्यात आला.

सध्या या परिचारिकेला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वाडिया प्रशासनाने सांगितले. मात्र परिचारिकेला बाधित असल्याचे सांगण्यात आले नाही. तसेच ती परिचारिका १० तास त्याच रुग्णालयात होती. प्रशासनाने दखल न घेता उशिर केला असल्याचे वाडिया बचाव कृती समिती निमंत्रकांनी सांगितले. अद्यापही दोन परिचारिका बाधित असल्याचाही आरोप कृती समितीकडून करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये सापडला कोरोनाचा रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -