घरमनोरंजनमहाभारतात पुनीत इस्सारची निवड 'या' दमदार भूमिकेसाठी; मात्र साकारला व्हिलन

महाभारतात पुनीत इस्सारची निवड ‘या’ दमदार भूमिकेसाठी; मात्र साकारला व्हिलन

Subscribe

महाभारतात अभिनेता पुनीत इस्सार यांनी दुर्योधनाची भूमिका साकारली होती. मात्र निर्माते बी. आर. चोप्रा यांनी पुनीत इस्सार यांची वेगळ्याच भूमिकेसाठी निवड केली होती.

सध्या छोट्या पडद्यावर पौराणिक जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या जात आहेत. रामायणानंतर बी. आर. चोप्रा यांची महाभारत हीदेखील मालिका आताच्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. १९८८ ते १९९० साली दाखवल्या जाणाऱ्या महाभारतात अभिनेता पुनीत इस्सार यांनी दुर्योधनाची भूमिका साकारली होती. तर २०१३ – २०१४ साली आलेल्या नव्या महाभारतातही त्यांनी परशुराम ही व्यक्तिरेखा साकारली होती. याची निर्मिती सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी केली होती. या दोन्ही मालिका टीव्हीवर दाखवल्या जात आहेत. पुनीत इस्सार यांनी दुर्योधनाची भूमिका खुपच लोकप्रिय ठरली होती. आजही त्यांची ही भूमिका अजरामर आहे. मात्र महाभारताचे निर्माते बी. आर. चोप्रा यांनी पुनीत इस्सार यांची वेगळ्याच भूमिकेसाठी निवड केली होती. याचा उलगडा एक वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत पुनीत यांनी केला आहे. पाच पांडवांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे भाऊ भीम ही दमदार आणि बलशाली व्यक्तीची भूमिका पुनीत इस्सार यांना मिळाली होती. परंतू ती त्यांनी नाकारली.

हेही वाचा – ‘या’ कारणामुळे रामायणातील राम सरकारवर नाराज!

- Advertisement -

अशी मिळाली दुर्योधनाची भूमिका 

महाभारतातील भूमिकेच्या निवडीबाबत बोलताना पुनीत इस्सार म्हणाले की, जेव्हा मी ऑडिशनसाठी बी. आर. चोप्रा यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा माझे व्यक्तिमत्त्व पाहिल्यावर ते म्हणाले, ‘तुला भीम म्हणून घेतले जात आहे’. मी म्हणालो ‘नाही सर, मी महाभारत वाचल आहे आणि मला फक्त दुर्योधनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन द्यायला आवडेल. त्यावर ते म्हणाले, ‘आश्चर्य आहे, आम्ही तुम्हाला हिरो बनवू पाहतोय आणि तुम्हाला खलनायक बनायचे आहे.’ यावर मी त्यांना सांगितले की, महाभारतात दुर्योधनच्या व्यक्तिरेखेचे विशेष ​​महत्त्व काय आहे हे मला माहिती आहे. जयद्रथ वध हे पुस्तक मी वाचले होते. हे मैथली शरण गुप्त यांनी केलेले महाकाव्य आहे. हे काव्य स्वरूपात आहे आणि मला ते मनापासून आवडते. मी जयद्रथ वधाचे पठण केले आणि लगेचच दुर्योधनाच्या भूमिकेची निवड केली. अखेर निर्मात्यांना माझी बाजू समजली आणि दुर्योधनाची भूमिका मला मिळाली, अशी माहिती पुनीत इस्सार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -