घरमुंबईसंशोधनातून शहरातील जीवनमान उंचावण्यास मदत होईल

संशोधनातून शहरातील जीवनमान उंचावण्यास मदत होईल

Subscribe

शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांचे मत

१९९१ नंतर शहराचे जीवन वेगाने बदलण्यास सुरुवात झाली. हे बदल सर्वच विषयाशी संबंधित आहेत. या परिषदेतून संशोधक शहराच्या विविध समस्या व उपाययोजनाही स्पष्ट करतील. या परिषदेच्या शिफारशीतून शहरातील जीवनमान उंचावण्यास मदत होईल. मुंबई शहरातील या महत्त्वाच्या विषयावर ही परिषद घेतल्याबद्दल मुंबई विद्यापीठ अभिनंदनास पात्र आहे, असे मत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेतर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय बहुशाखीय परिषदेचे उद्धाटन डॉ. धनराज माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर परिषदेत स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. धनराज माने यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेमध्ये मुंबई शहराशी संबंधित विषयावर ११६ संशोधकांनी आपले संशोधनपर शॊधनिबंध सादर केले.

- Advertisement -

यावेळी डॉ. धनराज माने म्हणाले की, यामुळे सध्याच्या काळात शिक्षणाचा जीईआर वाढत आहे. यामुळे शासनाचे देखील उच्च शिक्षणाकडे लक्ष आहे व शासनाने त्यासंदर्भात अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यात ‘ए ’ ग्रेड महाविद्यालयांना स्वायत्तता देणे. मुंबईमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने दोन समूह (क्लस्टर) विद्यापीठे स्थापन केली आहेत. पुढील पाच वर्षात आणखी काही क्लस्टर विद्यापीठे स्थापन करणार आहे. तसेच राज्यातील अनेक भागामध्ये मॉडेल कॉलेज सुरू करणार आहेत. राज्यातील महाविद्यालये नॅक मानांकित होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग लवकरच महाराष्ट्र राज्य असेसमेंट व ऍक्रिडिएशन सेल सुरु करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महाविद्यालयांना नॅक मानांकन करण्यासाठी मदत केली जाईल. तसेच शासन पुणे येथे लवकरच नवीन नियुक्त होणार्‍या व सध्याच्या शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण अकादमी सुरू करणार आहे. या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, या परिषदेमध्ये शहरातील अनेक बाबींवर चर्चा होईल. या परिषदेतून ज्या अनेक सूचना येतील त्या शिफारशीतून या शहराच्या विकासास मदत होईल. या परिषदेत प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच आयडॉलच्या संचालिका डॉ. कविता लघाटे ,काश फाऊंडेशनच्या डॉ. विजयालक्ष्मी जाधव व डॉ. अवकाश जाधव यांनी आपले विचार मांडले. तसेच फ्रान्सचे संशोधक सायमन फ्रेडरिक यांनी याप्रसंगी फ्रान्स व युरोप शहरातील सद्यस्थितीविषयी माहिती दिली व तेथील शहराच्या जतनासंबंधी व ऐतिहासिक वारसासंबंधी माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -