घरमुंबईशिवसेनेने फोडलेले राष्ट्रवादीचे अकरा नगरसेवक परत करा !

शिवसेनेने फोडलेले राष्ट्रवादीचे अकरा नगरसेवक परत करा !

Subscribe

प्रमोद हिंदुराव यांचा हल्लाबोल

 पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीने फोडल्याचे जोरदार पडसाद ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत उमटल्यानंतर राष्ट्रवादी कमालीची आक्रमक झाली आहे. पारनेरमधील पाच नगरसेवक शिवसेनेला परत हवे असतील तर भिवंडी, कल्याण, मुरबाडमधील शिवसेनेने फोडलेले राष्ट्रवादीचे अकरा सदस्य राष्ट्रवादीला परत करा अशा आक्रमक मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे ‘मातोश्री’ची दिशाभूल करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक मुख्यमंत्री अजित पवार यांनी फोडून राष्ट्रवादीत आणले होते. हे पाच नगरसेवक शिवसेनेला परत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवारांकडे केली आहे. त्याला राष्ट्रवादीतून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीची युती असताना पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर, मुरबाड, कल्याणमधील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे अकरा सदस्य फोडून ठाणे जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केल्याचा आरोप प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे.

- Advertisement -

जर पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत हवे असतील तर राष्ट्रवादीचे वजने फोडले 11 सदस्य आधी परत करा, असा निर्वाणीचा इशारा हिंदुराव यांनी शिवसेनेला दिला आहे. काल झालेल्या कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही शिवसेना, राष्ट्रवादीची युती असताना एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी भाजपशी युती केल्याचा आरोप हिंदुराव यांनी केला आहे. आधी राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडायचे आणि मग राष्ट्रवादी नगरसेवक फोडल्यास जिल्हा नेत्यांनी नाकाने कांदे सोडायचे असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -