घरमुंबईसुशांतचे Debit Card रियाने केले होते लंपास; त्याच्या मृत्यूनंतरही करायची त्यातूनच शॉपिंग

सुशांतचे Debit Card रियाने केले होते लंपास; त्याच्या मृत्यूनंतरही करायची त्यातूनच शॉपिंग

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील कथित आरोपी रिया चक्रवर्ती हिच्या गळ्याभोवतीचा फास आणखीनच घट्ट होत चालला आहे. आधी मुंबई आणि बिहार पोलिसांचा तपास, नंतर पैशांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि आता सीबीआयकडे केस वर्ग केल्याने हे प्रकरण वेगवेगळी वळणे घेत आहेत. दरम्यान, रियाच्या विरोधातील एक एक धक्कादायक खुलासे या तपासातून समोर येत असून तिने सुशांतचे डेबिट कार्ड चोरून त्यातून शॉपिंग करत असल्याची आणखी एक माहिती समोर आली आहे.

केंद्रीय एजंसीच्या टीमने दोन मोबाईल फोन जप्त केले असून त्या संबंधीत तपास सुरू आहे. त्यातील बहुतांश डेटा आधीच गायब झाल्याचेही समोर आले आहे. त्यातील डिलीट केलेले नंबर पुन्हा रिस्टोअर करण्याचे काम सुरू आहे. यासाठी दोन्ही फोनचे क्लोन बनवण्यात आले आहेत. त्यातून ही माहिती समोर आली आहे. मोबाईलचा डिजिटल डेटा तपासल्यानंतर रिया, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, शोविक चक्रवर्ती आणि जया यांच्यात बरीच व्हॉट्सअॅप चॅट समोर आली आहेत. सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्ती सुशांतच्या पैशांचा वापर स्वत:च्या वैयक्तिक खर्चासाठी करत असल्याचे व्हॉट्सअॅप चॅटच्या तपासात समोर येत आहे. सुशांतच्या डेबिट कार्डचा पिन नंबर रियाला सॅम्युअल मिरांडाच्या मदतीने माहिती झाला होता. रिया चक्रवर्ती २०१७ साली नार्कोटिक्स सब्सटेंसचा वापर आणि खरेदी करण्यात सामील होती. रिया आणि सॅम्युअल मिरांडा यांच्यात १७ एप्रिल २०२० आणि १ मे २०२० ला शोविक चक्रवर्तीकडून २ बॅग वीड घेण्यासाठी १७ हजार रुपये देण्याचे बोलले गेले, असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. तसेच सुशांतच्या मृत्यूनंतरही रिया त्या कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करत असल्याचे समजते.

- Advertisement -

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा ऍन्गल समोर आल्यामुळे नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) नेदेखील या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सुशांत सिंह प्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत.

हेही वाचा –

Corona Virus : धोक्याची घंटा, भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -