घरमुंबईभिवंडीत वाहन चोरीचे सत्र थांबता थांबेना; दोन रिक्षांसह दुचाकीची चोरी

भिवंडीत वाहन चोरीचे सत्र थांबता थांबेना; दोन रिक्षांसह दुचाकीची चोरी

Subscribe

भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली असून या वाहन चोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन ठोस उपाययोजना अवलंबवणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भिवंडी शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असल्याने वाहन चोरांना भिवंडी पोलिसांचा धाक उरलेला नाही, असे दिसून येत आहे. त्यामुळे वाहन चोर आणि पोलीस यांचा पाठ शिवणीचा खेळ सुरु आहे, अशी शंका सामान्य नागरिकांना पडली आहे. शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली असून या वाहन चोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन ठोस उपाययोजना अवलंबवणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांची चोरी 

दरम्यान, विविध घटनांमध्ये दोन ऑटोरिक्षा तर एक दुचाकी चोरीला गेल्याच्या तीन घटना शहरात घडल्या आहेत. पहिल्या घटनेत समदनगर येथील मामाभांजा अपार्टमेंटमध्ये राहणारे मोहम्मद अनिस खान (वय ४६) यांची हिरोहोंडा मोटार सायकल क्र. एमएच – ०४ – ईजे – ५३६३ ही राहत्या इमारतीखाली उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डी. के. शिंदे करत आहेत. तर दुसऱ्या घटनेत न्यू टावरे कंपाऊंड, नारपोली येथे राहणारे रिक्षाचालक श्रामजीत राजपत मल्ला (वय ५५) यांनी त्यांची रिक्षा एमएच – ०४ – एच झेड – ०२९६ ही नागाव येथील मोकळ्या मैदानात पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. भवार करत आहेत. तर तिसऱ्या घटनेत शांतीनगर परिसरातील आझादनगर येथील रिक्षाचालक रोशन मोहम्मद अली शेख (वय ५५) यांनी त्यांच्या घरासमोरील स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत पार्क करून ठेवली होती. त्यांची ऑटो रिक्षा क्र. एमएच – ०४ – एके १०७४ ही रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या रिक्षा चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अंकलेकर करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘दोन हरलेले नेते एकत्र आले की, हरण्याचे दु:ख कमी होते’

मुंबईत गिरणी कामगारांसाठी म्हाडाची पाच हजार घरं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -