घरमुंबईउल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाने मारली शहाड उड्डाणपुलावरून उडी

उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाने मारली शहाड उड्डाणपुलावरून उडी

Subscribe

व्याजाने घेतलेले पैशे परत देत नसल्याच्या कारणावरून रिक्षाचालकासह त्याच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केल्याने वैतागलेल्या त्या रिक्षाचालकाने शहाड ब्रीजवरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला.

व्याजाने घेतलेले पैशे परत देत नसल्याच्या कारणावरून रिक्षाचालकासह त्याच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केल्याने वैतागलेल्या त्या रिक्षाचालकाने शहाड ब्रीजवरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तो जखमी झाल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन महिलांचा सहभाग आहे.

काय आहे घटना 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शहरातील कॅम्प १ येथील शहाड फाटक परिसरात रिक्षाचालक साजिद शेख (वय २९) हा राहतो. त्याने रवी लदगे व त्याचा मित्र अक्षय गायकवाड यांच्याकडून व्याजानी पैशे घेतले होते. त्या पैशासाठी त्या दोघांनी साजिद याच्याकडे तगादा लावला होता. साजिद पैशे परत देत नसल्याने त्या दोघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच साजिद याची आई परविन हिला रवीची बहीण ज्योती तसेच कवीता यांनी देखील मारहाण केली तसेच पैशे दिले नाही तर अशी धमकी देऊन त्यांचा व्हिडिओ बनवून घेतला. त्या चौघांच्या त्रासाला वैतागून व घाबरून साजिद याने कॅम्प १ येथील शहाड ब्रीजवरून उडी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जे. जे. रूग्णालय मुंबई येथे अ‍ॅडमीट करण्यात आले आहे. या प्रकरणी साजिद याने दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात रवी, अक्षय, ज्योती व कविता या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी व अक्षय या दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सानप करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

काँग्रेस आमदार निर्मला गावित यांचा राजीनामा; उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

‘भारतावर अणू बॉम्ब टाकून बेचिराख करु’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -