घरमुंबईमुदत संपुनही रस्त्यांचे काम अपूर्णच

मुदत संपुनही रस्त्यांचे काम अपूर्णच

Subscribe

रस्ता बांधणींचे वर्क ऑर्डर घेउन 18 महिने उलटले तरी रस्त्यांचे काम अपूर्ण राहीले. त्या कामांत दजार्र् बिघडुन ठिकठिकाणी खड्डे पडल्याने टेंडर घेतलेल्या एजन्सीला पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंताने कामांत दिरंगाई केल्याबद्दलची नोटीस बजावली आहे.

दोन कोटी 36 लाख 79 हजार 718 रूपयांचा टेंडर असलेल्या उसरणी ते मथाने 3.1 कि.मी.,एडवणच्या पुढील वळण ते खार्डी हददीपर्यंत 3.75 कि.मी.असा 6.76 कि.मी.चा रस्ता बांधणींचा ठेका विनय भारद्वाज या एजन्सीला 4 ऑक्टोबर 2018 रोजी 18 महिन्यांच्या मुदतीसह मिळाला होता. रस्त्यांच्या कामांची सुरूवात वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर करण्यात आली होती. जानेवारी 2019 ते मे 2019 या दरम्यान जलद गतीने काम उरकण्यात आले. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. जोरदार पावसामुळे 50 एम.एम.डांबराचा थर असलेला हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला गेला. याबाबत पालघरचे उप अभियंता महेंद्र किणी यांनी मुदतीत काम पूर्ण न केल्याने 24 नोव्हेंबर 2019 रोजी नोटीस बजावली आहे. शिवाय कामांमध्ये दिरंगाई केल्याबद्दल 24 नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

मे 2019 महिन्यात या रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे या रस्त्यांत काही ठिकाणी झालेले डांबरीकरणाचे भाग सुटटे झाले आहे. ते आम्ही ठेकेदार एजन्सीला काम करून झालेल्या कामांचे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे केळवा माहिम शाखेचे शाखा अभियंता अरूण चौधरी यांनी दै.आपलं महानगरला माहिती देताना सांगितले. ठेकेदार एजंसीने केलेेले काम निकृष्ट दर्जाचे असल्यास त्या कामांमध्ये सुधारणा सुचवून ते काम पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून आम्ही आमची जबाबदारी स्वीकारून या कामांतील दर्जा सुधारवून काम जलद गतीने करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पालघरचे उप अभियंता महेंद्र किणी यांनी माहिती देताना सांगितले.

दोन कोटी 36 लाख 79 हजार 718 रूपयांचा या ठेक्यातील कामांपोटी आतापर्यत 75 टक्के रक्कम ठेकेदार एजन्सीला अदा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या कामांसाठी अदा केलेल्या रक्कमांसाठी एम.बी.रेकॉर्डीग करताना आणि बिलींग करताना या रस्त्यांतील बिघडलेला दर्जा सार्वजनिक बांधकाम विभागाचे केळवा माहिम शाखेचे शाखा अभियंता अरूण चौधरी यांना का लक्षात आला नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्याठिकाणी हा रस्ता तयार करण्यात आला आहे, त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करणारा शाखा अभियंता असून रस्ता बिघडल्याचे त्यांच्या लक्षात का आले नाही, असा सवाल स्थानिक पातळीवर ग्रामस्थ विचारू लागले आहेत.निकृष्ट दजांचा रस्ता बनवल्यानंतरही बिलापोटी रक्कमा अदा करण्याची एवढी घाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाने का केली असा सवाल उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

आगरवाडी, एडवण,दातिवरे येथील रस्त्यांत खड्डे पडले आहेत. काम चांगल्या प्रतीचे करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. लवकरच त्या कामांची आवश्यक प्रमाणात आणि ठिकाणी दुरूस्ती करून दर्जा सुधारून अद्ययावत करण्याच्या कामाला सुरूवात करणार आहोत.
– अतुल घरत, संचालक, विनय भारद्वाज एजन्सी, पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -