घरक्रीडारॉस टेलरने आत्मचरित्रात लिहिला द्रविडसोबतचा किस्सा, म्हणाला...

रॉस टेलरने आत्मचरित्रात लिहिला द्रविडसोबतचा किस्सा, म्हणाला…

Subscribe

न्यूझीलंडचा माजी फलंदाज  रॉस टेलर सध्या त्याच्या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. त्याने या आत्मचरित्रात द्रविडसोबतचा किस्सा लिहिला आहे.

नवी दिल्ली – न्यूझीलंडचा माजी फलंदाज  रॉस टेलर सध्या त्याच्या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या त्याच्या आत्मचरित्रात दररोज नवनवीन किस्से येत आहेत आणि चाहत्यांना केवळ टेलर बद्दलच नव्हे तर इतर अनेक क्रिकेटपटूंसोबतच्या त्याच्या मजेदार किस्से जाणून घेण्याची संधी मिळत आहे. असाच एक मजेशीर किस्सा रॉस टेलरने या पुस्तकाद्वारे शेअर केला आहे. ज्यात त्याने राहुल द्रविडसोबत वाघ पाहण्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे.

एकदा तो आणि राहुल द्रविड रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये वाघ पाहायला गेले होता. पण तिथल्या लोकांना वाघापेक्षा राहुल द्रविडला बघण्यात जास्त रस होता. पुस्तकाच्या एका भागात द्रविडने याआधी २१ वेळा सफारीला भेट दिली होती पण त्याला वाघ दिसला नाही याचा उल्लेख आहे. पण राजस्थान रॉयल्सचे हे दोन खेळाडू रॉस टेलर आणि द्रविड रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये गेले तेव्हा त्यांना वाघ दिसला. पण तिथले लोक या दुर्मिळ वन्य प्राण्यापेक्षा राहुल द्रविडला पाहण्यात जास्त रस दाखवत आहेत हे पाहून रॉस टेलरला आश्चर्य वाटले, असे त्यांने आत्मचरित्रात लिहीले आहे.

- Advertisement -

या घटनेचा संदर्भ देत पुस्तकात लिहिले आहे की, मी द्रविडला विचारले की तू वाघ किती वेळा पाहिला आहेस? तो म्हणाला की मी वाघ पाहिला नाही. मी इथे २१ वेळा आलो असेल पण मी वाघ पाहिला असे कधीच घडले नाही. मी म्हटले 21 सफारी केल्या आणि एकदाही वाघ पाहिला नाही. मला माहीत असते तर मी कधीच आलोनसतो.मी  डिस्कव्हरी बघितले असते.

टेलरने पुढे सांगितले की, आम्ही एका मोठ्या कारमधून वाघ बघायला गेलो होतो आणि शेवटी आम्ही त्याला पाहिले. आमच्या गाडीपासून तो फक्त 100 मीटर अंतरावर होता. पण इतर लोकांच्या वाहनातील कॅमेऱ्यांचे लक्ष अचानक राहुल द्रविडवर गेले. ते द्रविडला पाहण्यासाठी जितके उत्साही होते तितकेच आम्ही वाघ पाहण्यासाठी उत्सुक होतो. त्याने पुढे लिहिले की संपूर्ण जगात सुमारे 4,000 वाघ आहेत पण राहुल द्रविड हा एकच आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -