घरमुंबईरेल्वेच्या नादुरुस्ती राऊटर स्क्रीन्सला तायवांगचा उतारा

रेल्वेच्या नादुरुस्ती राऊटर स्क्रीन्सला तायवांगचा उतारा

Subscribe

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक सूचना आणि जाहिराती झळकवतानाच रेल्वेला स्थानकांना मार्डन लूक आणि टच देण्यासाठी विदेशातून आणलेली ३६० डिग्रीमध्ये फिरणारी राऊटर स्क्रीन्स सध्या भंगारात निघाली आहेत. सतत तांत्रिक बिघाडामुळे ही स्क्रीन्स कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेची राऊटर स्क्रीन्सची पहिलीच योजना फ्लॉप ठरली आहे. आता या विदेशी राऊटर स्क्रीन्स तायवांगला जिथून आणल्या तिथे परत पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत उपनगरीय लोकल गाड्यांमधून जवळपास ७२ लाख प्रवासी प्रवास करतात. यातील ४० लाख केवळ मध्य रेल्वेचे तर ३० लाख प्रवासी पश्चिम रेल्वेचे आहेत. हे प्रवासी ज्या मार्गावरून प्रवास करतात तेथील रेल्वे स्थानके, लोकलमध्ये, होर्डिंग, एलसीडी, तिकीट आरक्षण केंद्रे आदी ठिकाणी जाहिराती करण्यात येतात. प्रवाशांना सूचना देण्यासाठी आणि जाहिरात करण्यासाठी रेल्वेने ३६० डिग्रीमध्ये फिरणारी राऊटर स्क्रीन्स मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर लावली आहेत. या राऊटर स्क्रीन्सचा आकार ८० से. मी.लांब तर १ .५ डायमीटर आहे. तर उंची ३ फूट आहे. अत्यंत हाय ब्राइटनेस व हाय रिझोल्युशन आणि कमीत कमी वीज या राऊटर स्क्रीनला लागते. सोबतच एकाच वेळी तीन समान व्हिडिओ प्रदर्शित केले जाऊ शकतात. या राऊटर स्क्रीन्स भारतीय कंपनीच्या नसून विदेशी बनावटीच्या आहेत. ती तायवानच्या एका कंपनीने तयार केली आहेत. २०१३ मध्ये पश्चिम रेल्वेने सर्वप्रथम ही राऊटर स्क्रीन्स चर्चगेट येथे लावली. तेव्हा प्रवाशांना त्याचे विशेष आकर्षण वाटत होते. या माध्यमातून जाहिराती झळकवण्यात येत असत. तसेच रेल्वेकडून प्रवाशांना सूचना दिल्या जात असत. मात्र, या स्क्रीन्समध्ये सतत तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे ते हळूहळू बंद पडू लागले.

- Advertisement -

देखभालीचा अभाव
३६० डिग्रीमध्ये फिरणारी राऊटर स्क्रीन्सची नेहमी देखभाल होत नसल्यामुळे सध्या त्या बंद अवस्थेत आहेत. मोठा बिघाड झाल्यास या राऊटर स्क्रीनला खाली उतरवणे आणि दुरुस्ती करणे रेल्वेला खूप खर्चिक पडते. सोबतच या स्क्रीनची देखभाल करण्यास रेल्वेकडे स्वतःची यंत्रणा नाही. त्यामुळे बिघाड झाल्यास बाहेरील मेकॅनिककडून दुरुस्ती करून घ्यावी लागते. ही राऊटर स्क्रीन्स निकामी झाल्यामुळे रेल्वेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. ती कुचकामी ठरत असल्यामुळे परत पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक ‘ आपलं महानगर’ला दिली.

रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरविणे रेल्वेला शक्य होत नाही. असे असताना रेल्वेला अशी महागडी राऊटर स्क्रीन्स लावण्याची काय गरज होती. रेल्वेकडे या राऊटर स्क्रीन देखभालीची व्यवस्था नाही. तसा अनुभवसुद्धा नाही. त्यामुळे ती भंगारात निघाली आहेत. ही विदेशी राऊटर स्क्रीन लावून कोणाचा आर्थिक फायदा करून दिला जात आहे. यात रेल्वे अधिकार्‍यांचे आर्थिक संबंध तर गुंतलेले नाहीत ना, याविषयीची संपूर्ण चौकशी रेल्वे प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
– सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

- Advertisement -

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी ३६० डिग्रीमध्ये फिरणारी राउटर स्क्रीन्स लावण्यात आली आहेत. मात्र या स्क्रीन्समध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे ती बंद आहेत. मात्र हा बिघाड या आठवड्यात दुरुस्त करण्यात येईल.
-आरती सिंह परिहार, सिनियर कमर्शियल मॅनेजर, पश्चिम रेल्वे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -