घरमुंबईदादर स्थानकावर आरपीएफने वाचवले २ महिलांचे प्राण

दादर स्थानकावर आरपीएफने वाचवले २ महिलांचे प्राण

Subscribe

लोकल पकडण्याच्या घाईत दोन महिलांचा जीव रेल्वेखाली जाणार होता. घटनास्थळी उभे असलेले आरपीएफ जवान यांच्या सतर्कतेमुळे या दोन महिलांचा जीव वाचला आहे.

एका आरपीएफ जवानने सोमवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान दोन महिलांचा जीव वाचवला आहे. लोकल गाडी पकडण्याच्या भानगडीत या महिला रेल्वेखाली जाणार होत्या. परंतु, आरपीएफ जवान आर. के. यादव यांच्या सतर्कतेमुळे या महिलांचे प्राण वाचले. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. आर. के. यादव यांच्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ही घटना दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर घडली आहे. या घटनेमध्ये दोन्ही महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

हेही वाचा – लाइफलाईन ठरते जीवघेणी ; एका दिवसात ११ जणांचे मृत्यू

- Advertisement -

रेल्वेकडून वेळोवेळी आवाहन

रेल्वेगाडी पकडताना सांभाळून चढा किंवा सांभाळून उतरा, असे आवाहन वेळोवेळी रेल्वेकडून करण्यात आले आहे. रेल्वेमध्ये असलेले इंडिकेटर्सही प्रत्येक स्टेशन येते, तेव्हा प्रवाशांना सांभाळून उतरण्याचे आवाहन करत असते. पंरतु, या आवाहनाकडे प्रवासी काना डोळा करताना दिसत आहे. गेल्या महिन्यात एका सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला होता. या अहवालात सांगितले गेले होते की, प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे दररोज दहा पेक्षा अधिक जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो. रेल्वे अपघातात मृत्यू होणाऱ्या घटनांमधूनही प्रवासी काही शिकताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी दादर स्थानकावरच एका ट्रेकरचा जीव गेला होता. या अशा घटनांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एका आरपीएफ जवानानेच दोन महिलांचा जीव वाचवला होता. अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती सोमवारी रात्री दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर घडली आहे.

हेही वाचा – स्वच्छ रेल्वे स्थानकाच्या यादीत बांद्रा, सीएसटी आणि दादर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -