घरमुंबईकुंपणानेच शेत खाल्ले

कुंपणानेच शेत खाल्ले

Subscribe

सीएसएमटी स्थानकात टीसीकडून ३३ लाख रुपये हडफ

विनातिकीट रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यासाठी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस काम करतात. मात्र सीएसटी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस म्हणून काम करणार्‍या एका अधिकार्‍याने प्रवाशांकडून वसूल केलेले दंडाचे पैसे रेल्वेच्या कोषागारात भरले नसल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा भोंगळ कारभार सुरू होता. रेल्वेकडून दंड वसूल करण्यासाठी देवू केलेल्या पावत्यांचा उपयोग करून तो प्रवाशांकडून वसूल केलेले पैसे तो वैयक्तिक खर्चासाठी वापरत होता. तब्बल ३३ लाख इतकी रक्कम त्याने आतापर्यंत हडप केल्याचे समोर आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस म्हणून काम करणार्‍या भुपेंद्र रामदास वैद्य यांनी रेल्वे प्रशासनाकडून दंड वसुल करण्यासाठी देण्यात आलेल्या पावती पुस्तकांचा वापर करून प्रवाशांकडून लाखो रुपये वसूल केले. मात्र वसूल केलेले पैसे रेल्वेच्या कोषागारात न भरता त्यांनी वैयक्तिक खर्चासाठी वापरले होते. मात्र रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच भुपेंद्र वैद्य याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, वारंवार सुचना देऊनही त्यांनी रेल्वेला ती रक्कम परत न केल्याने अखेर प्रशासनातर्फे त्यांच्यावर सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुपेंद्र वैद्य याला अद्याप अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी सांगितले.

- Advertisement -

4 वर्षांपासुन सुरू होती ठगगिरी

२०१२ साली भुपेंद्र वैद्य यांची तिकीट तपासणीस म्हणून सीएसएमटी रेल्वे स्थानकात नेमणूक करण्यात आली होेती. रेल्वे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी टीसींना एकाच वेळी दोन पावती पुस्तके दिली जातात. त्यांचा वापर करुन वसूल होणारा दंड रेल्वे कोषागारात भरावा लागतो. मात्र भुपेंद्र वैद्य याने त्यामध्ये अफरातफर करायला सुरुवात केली. रेल्वेकडून केल्या जाणार्‍या ऑडिटमध्ये ही बाब समोर आली आणि त्यानुसार वैद्य याने अशी किती रक्कम हडप केली आहे याचा लेखाजोखा काढण्यात आला. २०१२ ते २०१६ सालापर्यंत एकूण ३३ लाख रुपये वैद्य याने रेल्वेची दिशाभूल करून कोषागारात भरले नव्हते.

- Advertisement -

ही बाब समोर येतात आरोपीला तत्काळ पैसे भरण्याची नोटीस देवून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. यानंतर वैद्य याने ३३ लाखांपैकी पाच लाख रेल्वेच्या कोषागारात भरले असून उर्वरित २८ लाखांची रक्कम त्याने अद्याप भरली नसल्याने त्याच्याविरुद्ध सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -