घरमुंबईमुंबई विद्यापीठाने ३५ हजार पास विद्यार्थ्यांना केले नापास

मुंबई विद्यापीठाने ३५ हजार पास विद्यार्थ्यांना केले नापास

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार सातत्याने समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाचा गोंधळ तर मुंबईकरांसाठी आता नवीन राहिला नाही. विद्यापीठाची मूल्यांकन प्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठातून परीक्षा दिलेल्या परंतु नापास झालेल्या ९७ हजार विद्यार्थ्यांनी पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यातील ३५ हजार विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात विद्यापीठाने चुका केल्याचे निष्पन्न झाले होते. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या निकालानंतर जवळपास १.८१ लाखांहून अधिक पेपरच्या कॉपी ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या आहेत. हा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. आतापर्यंतच्या पुनर्मूल्यांकनाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आहे. या संपूर्ण प्रकारावरून एक गोष्ट सिद्ध होते की, विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवर विश्वास नाही.

गेल्या ३ वर्षांत २०१४ ते २०१६ मध्ये जवळपास ७३ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या गेल्याचे समोर आले आहे. या कारणास्तव त्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. त्यामुळे मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील वर्षी समर सेशन परीक्षेदरम्यान ४९ हजार ५९६ विद्यार्थ्यांना ८५ हजार ६८ उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर साशंकता होती. तेव्हा त्यांनी त्या उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनाला पाठवल्या होत्या. त्यात १६ हजार ७३९ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासण्यात चुका झाल्याचे आढळले होते. पुनर्मूल्यांकनांतर त्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले.

- Advertisement -

२०१७ साली दुसऱ्या सत्रातही जवळपास ४७ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी ७६ हजार ८६ उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. त्यामध्ये १८ हजार २५४ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासताना विद्यापीठाकडनून चुक झाल्याचे आढळले होते.

२०१६ साली प्रथम पहिल्या सहामाही परीक्षेत पहिल्या सत्रातही ४४ हजार ४४१ विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली होती. त्यापैकी १६ हजार ९३४ विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण करण्यात आले होते. २०१४ मध्येही जवळपास ८० हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. ती संख्या यंदा लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -