घरCORONA UPDATEनगरसेवकाला कोरोनाची बाधा झाल्याची व्हाट्सअँपवर अफवा; ग्रुप ऍडमिन विरुद्ध गुन्हा दाखल 

नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाल्याची व्हाट्सअँपवर अफवा; ग्रुप ऍडमिन विरुद्ध गुन्हा दाखल 

Subscribe

व्हाट्सअँप ग्रुपवर अफवा पसरवणाऱ्या व्हाट्सअँप ग्रुपच्या दोन ऍडमिन विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“नगरसेवक तो कोरोना बाधीत आहे, त्याला आपल्या प्रभागामधून किटकनाशक फवारणी करून प्रभागामधून कोरोना मुक्तीचा संकल्प करू, सध्या तो होम क्वारंटाईन कोरोनाबाधित म्हणून गायब झाला आहे” अशा प्रकारच्या व्हाट्सअँप ग्रुपवर अफवा पसरवणाऱ्या व्हाट्सअँप ग्रुपच्या दोन ऍडमिन विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण खडकपाडा येथील प्रभाग क्रमांक १६चे शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांच्या बाबतीत मागील काही दिवसापासून येथील व्हाट्सअप ग्रुपवर खोटी अफवा पसरवून त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांना आपल्या प्रभागातून मुक्त करू या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात होत्या. हा प्रकार नगरसेवक देवळेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी गजानन पाटील आणि सुनिल उत्तेकर हे ऍडमिन असलेले ‘परिवर्तन ग्रुप’ व ‘सुवर्ण कोकण मराठा’ या व्हाट्सअप ग्रुप विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अर्जाची दखल घेऊन परिवर्तन ग्रुप आणि सुवर्ण कोकण मराठा ग्रुप या दोन व्हाट्सअँप ग्रुपचे ऍडमिन गजानन पाटील आणि सुनील उतेकर यांच्या विरोधात भा.द.वि.कलम १८८,५०१,५०५ (२) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५२,५४ व माहीती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

मलाच काय तर माझ्या प्रभागात कुठल्याही नागरिकाला कोरोनाची बाधा झालेली नाही, माझ्या विरोधात मुद्दामच या प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवा आत असल्याचे  तक्रारदार नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले, माझ्या प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मी माझ्या प्रभागात सतत कीटकनाशक फवारणी करीत आहे, स्वछता ठेवत आहे, तसेच गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करीत आहे, मी करीत असलेल्या चांगल्या कामाला विरोध करण्यासाठी विरोधाकडून परिवर्तन ग्रुप आणि सुवर्ण कोकण मराठा ग्रुप या व्हाट्सअँप ग्रुपवर गजानन पाटील आणि सुनील उतेकर यांच्याकडून अफवा पसरवल्या जात असल्याचे नगरसेवक देवळेकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -