घरदेश-विदेशKirit Somaiya: चहावाला देशाचे पंतप्रधान बनू शकतो, तर मी कोविड सेंटर चालवू...

Kirit Somaiya: चहावाला देशाचे पंतप्रधान बनू शकतो, तर मी कोविड सेंटर चालवू शकत नाही का?; राजीव साळुंखेंचा किरीट सोमय्यांना सवाल

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोविड सेंटरचे १०० कोटींचे कंत्राट मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलसमोरील चहावाल्याला दिल्याचा आरोप केला होता. याप्रकरणातील त्या चहावाल्याला किरीट सोमय्यांनी शोधले आहे. या चहावाल्याच्या शोधात किरीट सोमय्या आज परळमधील सह्याद्री नावाच्या हॉटेलमध्ये पोहोचले आणि यावेळी त्यांची चौकशी केली. पण सोमय्यांच्या पाहणी दरम्यान हॉटेलचे मालक राजीव साळुंखे तिथे हजर नव्हते. पण या घटनेनंतर राजीव साळुंखे यांनी आपले मत एका वृत्तावाहिनी बोलताना मांडले तसेच किरीट सोमय्या हे खोटे आरोप करत असून रितसर पद्धतीने ट्रेंडर घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री हॉटेल मालक राजीव साळुंखे काय म्हणाले?

‘आम्ही काय चोरी केलेली नाही. रितसर सरकारी पद्धतीने टेंडर घेतले आहे. त्यांना कुठे, कोणी खोटी बातमी दिली, हे मला माहित नाही. माझ्या हॉटेलला ७० वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळेस किरीट सोमय्यांचा जन्मदेखील झाला नसेल. सोमय्यांनी केलेले आरोप चुकीची आहेत. चहावाला जर देशाचे पंतप्रधान होऊ शकतो, तर एवढे वर्ष धंदा करणारा व्यक्ती लोकांची सेवा करण्यासाठी कोविड सेंटर नाही का चालवू शकत? कोरोनाकाळात माझ्या स्वतःच्या घरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मला फक्त सेवा करायची होती. आता उगाच सोमय्या आरोप करतायत आणि आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. याबाबत मी सध्या वकिलांसोबत सल्लामसलत करत आहे.’ असे राजीव साळुंखे म्हणाले.

- Advertisement -

किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, ‘पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये पारदर्शक पद्धतीने काम व्हावीत अशापद्धतीने कटाक्षाने प्रयत्न केला आहे. कोविड सेंटरच्या कामाशी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा संबंध नाही. यामध्ये सौरव रावसह काही अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांना जे काही करायचं आहे, ते अतिशय पारदर्शक पद्धतीने, चुकीच घटना काम नये, असे सांगण्यात आले होते.’


हेही वाचा – Kirit Somaiya: आरोप करणाऱ्यांना किंमत देण्याची गरज नाही, ही त्यांची पोटदुखी; मुख्यमंत्र्यांचा सोमय्यांना टोला

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -