घरमुंबईमनसेची भाजपवर खोचक टीका; 'भाड्याच्या व्यंगचित्रकाराला नक्कल करायचीही अक्कल नाही'

मनसेची भाजपवर खोचक टीका; ‘भाड्याच्या व्यंगचित्रकाराला नक्कल करायचीही अक्कल नाही’

Subscribe

मनसे आणि भाजपमध्ये सध्या ट्विटरवॉर सुरु आहे. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. 'भाड्याच्या चित्रकाराला नक्कल करण्याची देखील अक्कल नाही', अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

आज प्रजासत्ताक दिन! मात्र, याच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली आहे. ही टीका जिव्हारी लागल्यानंतर भाजपनेही राज ठाकरेंना व्यंगचित्राच्या स्टाइलने प्रत्युत्तर दिले. मात्र हे उत्तर देत असताना राज ठाकरेंची व्यंगचित्रावरील सही काढायला भाजप विसरले नाहीत. त्यामुळे आता मनसेकडून भाजपची चक्क खिल्ली उडवडण्यात आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर ‘भाड्याच्या चित्रकाराला नक्कल करण्याची देखील अक्कल नाही’, अशा शब्दांत जोरदार टीका केली. त्यामुळे ऐन प्रजासत्ताक दिनी भाजप आणि मनसेमध्ये व्यंगचित्राचे घमासान चांगलेच रंगले आहे.


हेही वाचा – राज ठाकरे-भाजपमध्ये आता ‘व्यंगचित्र’ वॉर!

- Advertisement -

काय आहे राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात?

राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय प्रजासत्ताकला फाशी देत असताना भाजपचे अध्यक्ष अमित शाह त्यांच्या पाठिशी राहून त्यांना बळ देत आहेत, असे या व्यंगचित्रामध्ये दाखवण्यात आले होते.

Raj Thackeray Cartoon
राज ठाकरे यांचे व्यंगचित्र

काय आहे भाजपच्या व्यंगचित्रात?

दरम्यान, व्यंगचित्रातून मोदी आणि अमित शहा यांच्यावर राज यांनी टीका केल्यानंतर तिळपापड झालेल्या भाजपने प्रत्युत्तर देत राज यांच्यावर टीका केली. यावेळी राज ठाकरे यांना भाजपकडून फासावर लटकवण्यात आले आणि अच्छे दिन बघवत नसल्याची टीका केली.

BJP Cartoon on Raj Thackeray
राज ठाकरेंवर भाजपचे व्यंगचित्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -