पंतप्रधानच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका – संजय राऊत

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले आहे. त्यामुळे मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, असे आवाहन शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

sanjay raut
शिवसेना नेते संजय राऊत

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. त्यामुळे मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका. त्यांच्या या आवाहनामध्ये चांगली भावना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

‘सामना’ वृत्तपत्राचे कार्यलय माझे घर

राज्य सरकारने सर्वांना ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश दिले आहेत. घरात बसूनच काम करण्यास सांगितले आहे. मात्र, संजय राऊत ‘सामना’ वृत्तपत्राच्या कार्यलयात बसून काम करत आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता. त्यांनी सांगितले की, ‘सामना’ वृत्तपत्र हेच माझ कार्यालय आहे. त्यामुळे मी माझ्या घरी बसूनच काम करणार आहे. कार्यालयात शांतपणे बसून काम करणार आहे. तसेच कार्यालयात दुसरे कुणीच नसल्याने मला यावे लागले आहे. आम्ही गर्दीला मनाई केली आहे. त्यामुळे बहुदा मी कार्यालयात एकटाच असेन. जनतेने प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिलाय त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे’.

श्रद्धा दुखावण्याचा हेतू नाही

‘रोखठोक’ मध्ये मांडलेला विषय कोणाच्या श्रद्धा दुखावण्याचा हेतू नाही. गाडगे महाराजांचा विचार आहे. जेव्हा संकट येते, तेव्हा माणूसच संघर्ष करण्यासाठी उभा राहतो. एकमेकंपासून प्रेरणा घेतो. बाकी देव वैगरे श्रद्धा असतात. धर्माच्या नावावर आपण जो रक्तपात करीत आहोत. आपण दिल्लीत पाहिल. शेवटी धर्म वैगरे किंवा धर्माचे ठेकेदार येत नाहीत. आपण आहोत, शास्त्र आहे, आयुर्वेद आहे. शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे कोणाच्याही श्रद्धा दुखावण्याचा हेतू नाही’.

‘अत्यावश्यक सेवा सुरु राहिल्या पाहिजेत. या सेवेत काम करणारे सैनिक आहेत. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. दरम्यान, मुख्यमत्री उद्धव ठाकरे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या संकट काळात ते नेतृत्व करीत आहेत’, असं संजय राऊत म्हणाले.

माझे कुटुंबीयही कॉरन्टाईन

माझ्या घरातील सर्व कुटुंब सदस्य आज त्यांच्या खोलीत कॉरन्टाईन आहेत. कुणी घरातून बाहेर पडलेले नाही.


हेही वाचा – जनता कर्फ्यूला राज्यात उत्तम प्रतिसाद…’नाहीतर करोना येईल दारी…’