घरमुंबईसंजय राऊतांनी निवडणूक आयोगाला दिले उत्तर

संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला दिले उत्तर

Subscribe

माझा निवडणूक आयोगावर, निवडणूक प्रक्रियेवर आणि आयोगाच्या कार्यपध्दतीवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला उत्तर दिले आहे. संजय राऊत यांना सामनाच्या ‘रोखठोक’ लेखावरुन त्यांना मुंबई जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी ठपका ठेवत सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करीत येत्या दोन दिवसांत याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना उत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र

राऊतांनी या पत्रामध्ये असे म्हटेल आहे की, ‘ईव्हीएम मशीन घोटाळा बेगुसरायमध्ये झाला तरी चालेल हे वाक्य लिहिण्याच्या ओघात आले आहे. त्यामागे कोणातही वेगळा हेतू नाही. ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत अशा कोणत्याही व्यक्तीचा लोकसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत पराभव व्हावा. त्यांच्या निवडीमुळे देशाच्या सार्वभौम संसदेच्या पावित्र्याला धक्का पोहचू नये, अशी माझी राष्ट्रवादाची भावना आहे आणि त्याच प्रखर भावनेच्या ओघात हे वाक्य लिहिले गेले, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, माझा निवडणूक आयोगावर, निवडणूक प्रक्रियेवर आणि आयोगाच्या कार्यपध्दतीवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दैनिक सामनाच्या रविवारच्या अंकात रोखठोक या स्तंभ लेखनात संजय राऊत यांनी ईव्हीएमवर केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. संजय राऊत यांनी कन्हैया कुमारच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले होते. कन्हैया बिहारच्या बेगूसराय मतदारसंघातून यावर्षी लोकसभा निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघाविषयी संजय राऊत यांनी भाष्य केले होते. तसंच त्यांनी इव्हीएम मशीवर देखील टीका केली होती. स्तंभ लेखामध्ये त्यांनी ईव्हीएम घोटाळा बेगुसरायमध्ये झाला तरी चालेल, असे वाक्य लिहले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -