घरमुंबईसंजय राऊत यांच्या पत्नीची ५ जानेवारीला ईडीकडून होणार चौकशी

संजय राऊत यांच्या पत्नीची ५ जानेवारीला ईडीकडून होणार चौकशी

Subscribe

शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवून मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, वर्षा राऊत यांनी ईडीला अर्ज करून ५ जानेवारीपर्यंत मुदत देण्याची विनंती केली होती. ती मान्य करताना ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडी कडून तपास सुरू असून याच प्रकरणात वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यांना २९ डिसेंबर म्हणजेच आज ईडीसमोर हजर राहायचे होते. मात्र आज त्या ईडीसमोर हजर झाल्या नाहीत. त्यांच्यामार्फत आज एक अर्ज ईडीकडे सादर करण्यात आला होता. त्यात आपणास ५ जानेवारीपर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. ईडीने ही मुदत दिली असून आता त्यांना ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

- Advertisement -

आम्ही मध्यमवर्गीय माणसे आहोत. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही, ज्यांच्याकडे लपवण्यासारखे असते ते एकतर पळून जातात किंवा भाजपमध्ये जातात, असे संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांना सांगितले. ईडीला काही बाबी तपासायच्या असतील तर त्याला आमचे सहकार्यच राहील, असे नमूद करत आपली पत्नी चौकशीला सामोरी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -