घरमुंबईजपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेन स्टेशन निर्माण करण्याची संजीव जयस्वाल यांची भूमिका

जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेन स्टेशन निर्माण करण्याची संजीव जयस्वाल यांची भूमिका

Subscribe

पूर व्यवस्थापन, मलनिःसारण प्रक्रिया, परवडणारी घरे याबाबत जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भारतीय शिष्टमंडळ आग्रही

टोकियो शहरात गेले तीन दिवस सुरू असलेल्या नगर विकासवरील ११ व्या भारत-जपान संयुक्त कार्यक्रम गट परिषदेमध्ये शुक्रवारी भारतामध्ये मलनःसारण, पूर व्यवस्थापन, परवडणारी घरे याबाबत जपानी तंत्रज्ञान वापरण्याबाबत भारतीय शिष्यमंडळाने आपली भूमिका मांडली भारतातील गुंतवणुकीच्या संधीची माहिती दिली. दरम्यान जपानच्या धर्तीवर ठाणे शहरातून जाणा-या म्हातार्डी तसेच इतर बुलेट ट्रेनच्या स्टेशनची निर्मिती करण्यात यावी, अशी भूमिका ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या परिषदेमध्ये मांडली. तसेच जपानमधील या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थाना ठाण्यात आमंत्रित केले.

गेली तीन दिवस ही परिषद सुरू असून या परिषदेच्या आजच्या तिस-या दिवशी जपानमधील भारतीय दुतावासमधील राजदूत संजय वर्मा, मोना खंदारे, मंत्री, आर्थिक व्यवहार तसेच श्रीवास्तव, मंत्री राजकीय व्यवहार यांच्या पुढाकाराने भारतामध्ये गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्या तसेच भारतात काम करण्याची इच्छा असलेल्या गटासमोर भारताने अर्थ आणि उद्योग क्षेत्राच्या भरारीसाठी राबविलेल्या विविध धोरणाची माहिती दिली. या चर्चेमध्ये भारताच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, केंद्रीय नगर विकास विभागाचे संचालक सुनित मेहता, गुजरातच्या नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश पुरी, दिल्लीच्या एनसीआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक जैन आदी वरिष्ठ अधिका-यांनी यामध्ये सहभाग घेतला.

- Advertisement -

म्हातार्डी व इतर बुलेट ट्रेन स्टेशनची निर्मिती

प्रारंभी भारताच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी देशात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेची माहिती देतानाच भारताने या क्षेत्रात कशी उज्ज्वल कामगिरी केली आहे याचा लेखाजोखा मांडला. या परिषदेमध्ये बोलताना ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जपानमध्ये बुलेट ट्रेनच्या स्टेशनची निर्मिती ज्या पद्धतीने करण्यात आली आहे त्याच धर्तीवर ठाणे शहरातून जाणा-या म्हातार्डी तसेच भारतातील बुलेट ट्रेनच्या स्टेशनची निर्मिती करण्यात यावी असे सांगितले.

तसेच पूर व्यवस्थापन, मलनिःसारण व्यवस्था, परवडणारी घरे, भूयारी मलनिःसारण यंत्रणा यासाठी जे तंत्रज्ञान वापरले आहे ते तंत्रज्ञान भारतात वापरण्यासाठीची भुमिका मांडली व ठाण्यात त्यासाठी काय करता येईल, यासाठी त्यांनी तेथील तज्ज्ञ संस्थाना ठाण्यात आमंत्रित केले. यावेळी पूर व्यवस्थापनाबाबत जपानस्थित पॅसिफिक कन्सलटंट या संस्थेने मुंबईतील पूर स्थिती याबाबत केलेल्या पूर्व पडताळणी अहवालाचे सादरीकरण केले. ठाण्यातही अशाच पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी जयस्वाल यांनी या संस्थेला आमंत्रित केले आहे.


‘चंपा’ शब्द भाजपच्या मंत्र्यानेच दिला, अजित पवारांचा गौप्यस्फोट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -