घरमुंबईसिडकोकडून सानपाडा पोलीस ठाणे पास, आता मनपाची परीक्षा

सिडकोकडून सानपाडा पोलीस ठाणे पास, आता मनपाची परीक्षा

Subscribe

अगदी तुटपुंज्या जागेत काम चालणार्‍या सानपाडा पोलीस ठाण्यासाठी सानपाडा सेक्टर- ३ येथे नवीन जागा मंजूर झाली आहे. मात्र, त्यावर अद्याप कागदोपत्री व्यवहार प्रलंबित असल्याने जागेचा प्रश्न रखडला आहे. सिडकोकडून कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असली तरी अद्याप मनपाकडून मिळणार्‍या परवानगीची प्रतिक्षा आहे. पण, सध्या तारीख पे तारीख अशी अवस्था झाल्याने यंदा तरी हक्काच्या पोलीस ठाण्यात जायला मिळेल का? याची चिंता पोलिसांना लागली आहे.

दिवसेंदिवस जबाबदार्‍या वाढल्या. परंतु, पोलीस ठाण्याची जागा काही वाढली नाही. आज होईल, उद्या होईल असे करत करत दिवस निघून गेले. पण, आता सानपाडा पोलीस ठाण्यासाठी सानपाडा सेक्टर १३ येथे नवीन जागा मंजूर झाली आहे. कागदोपत्री व्यवहार अपूर्ण असल्याने पोलिसांना आणखी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सानपाडा पोलीस ठाण्यासाठी सानपाडा पामबीज लगत जागा निश्चित झाली आहे. त्याठिकाणी लवकर नवीन पोलीस ठाणे उभारावे यासाठी आमचाही पोलीस आयुक्तालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या पोलीस ठाण्याच्या जागेत नक्कीच अडचणी येत आहेत. आता सिडकोकडून जागेचा प्रश्न सुटला आहे. पालिकेकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. येत्या २ ते ३ महिन्यांत सदर प्रश्न मार्गी लागेल. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या कामाला सुरुवात होईल.                                                                                                                               – सूरज पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,सानपाडा पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -