घरमुंबईठाण्यात सेनेची वाट बिकट

ठाण्यात सेनेची वाट बिकट

Subscribe

ठाण्यात सेना की भाजप?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा गड असलेल्या ठाण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २०१९ची लोकसभा निवडणूक शिवसेनेसाठी कठीण ठरू शकते, असा सूर सध्या ठाण्यातून पहायला मिळत आहे. विधानसभेचे एकूण सहा भाग असणार्‍या ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे केवळ दोन आमदार आहेत. तर, भाजपचे तीन आमदार आहेत. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रे सेनेकडे असली तरी मुख्य ठाणे शहर भाजपकडेच आहे. शिवाय, मिरा – भाईंदरसह नवी मुंबईतील बेलापूर हा मतदारसंघही भाजपनेच बळकावला आहे. नवी मुंबईत येणारा ऐरोली हा एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ भाजपलाच हवा आहे. युतीच्या भरवशावर न बसता भाजपने आपली प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपनेही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. सध्या शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातदेखील नाराजी दिसून येत आहे. निवडून आल्यापासून खासदार साहेबांनी अपेक्षित कामे केली नाहीत, असा सूरदेखील ऐकू येत आहे.

ठाणे महानगरपालिकेत दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नाव आहे. ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांचा वरचष्मा आहे. त्यात माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही आपल्या कारकिर्दीत ठाण्याच्या विकासाला दिलेले प्राधान्य यामुळे एकत्र प्रयत्न केल्यास राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे. कारण, मोदी लाटेच्या आधी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्याच्या १८ आमदारांपैकी भाजपाकडे आठ, शिवसेनेकडे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार आमदार आहेत. त्यातील शिवसेनेच्या सहाही जागांवर उमेदवार देत भाजपा ठाणे जिल्ह्यावरील शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते. याची प्रचिती मागील पालघरमधील पोटनिवडणुकीत आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत युती झाली नाही तर सेनेची वाट बिकट असेल यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -