घरताज्या घडामोडीयेस बॅंकेतील ग्राहकांना ५० हजार काढता येणार!

येस बॅंकेतील ग्राहकांना ५० हजार काढता येणार!

Subscribe

रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्बधानंतर खातेदारांची चिंता वाढल्याच दिसत आहे. येस बँकेच्या संपादनास सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर भांडवली बाजारात सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. गुरुवारी येस बँकेच्या समभागाने तब्बल २६ टक्क्य़ांनी उसळी घेतली.

वाढत्या कर्जाच्या बोजामुळे येस (YES) बॅंकेवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यावर निर्बंध घातले आहेत. येस बॅंकेच्या ग्राहकांसाठी आरबीआयने नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ग्राहकांना पैसे काढताना फक्त ५० हजार रूपयेच काढण्याची कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे.

yes bank
येस बॅंकेच्या ग्राहकांना ५० हजार रूपये काढण्याची मर्यादा आज आरबीआयकडून निश्चित करण्यात आली

याआधी येस बँकेचे बाजार मूल्य ९,३९८.४९ कोटी रुपयांवर पोहोचले होते. मात्र, रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्बधानंतर खातेदारांची चिंता वाढल्याच दिसत आहे. येस बँकेच्या संपादनास सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर भांडवली बाजारात सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. गुरुवारी येस बँकेच्या समभागाने तब्बल २६ टक्क्य़ांनी उसळी घेतली.

- Advertisement -

कोणता बदल होणार ?

स्टेट बँकेचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार हे निर्बंध कालावधीदरम्यान येस बँकेचे प्रशासक म्हणून भूमिका बजावतील, असेही सांगण्यात येत आहे. सरकारच्या मंजुरीनंतर येस बँकेवर प्रशासकही नियुक्त करण्यात आला. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक आणि अन्य सहयोगी वित्तीय संस्थांच्या संघाकडून येस बँकेचे संपादन केले जाणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

 

आरबीआयने केलेल्या घोषणेनुसार आज एसबीआयचे माजी सीएफओ यांची येस बॅंकेवर प्रशासक म्हणून नेमणुक केली आहे. आगामी महिनाभर म्हणजे ३ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहे. येस बॅंकेचे संचालक मंडळ रद्द करण्याचा निर्णयही आज आरबीआयने घेतला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येस बॅंकेचा कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत गेला आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी आरबीआयची विशेष मंजुरी घ्यावी लागेल. बॅंकेच्या खातेदारांचा विश्वास वाढावा म्हणूनच आरबीआयमार्फत तातडीने ही पावले घेण्यात आली आहेत. केंद्र सरकारने एसबीआयच्या माध्यमातून येस बॅंकेत काही हिस्सेदारीही खरेदी करण्याचा पर्यायी धोरण राबवण्याचे संकेत मिळत आहेत.

या बँकांनाही लागले होते निर्बंध

वाणिज्यिक बँकेवर निर्बंध येण्याची ही गेल्या सहा महिन्यांतील दुसरी मोठी घटना आहे. कारण याआधी देखील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून रिझव्‍‌र्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादले होते. खोटी कर्जखाती दाखवून फसवा ताळेबंद सादर केल्या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादला होता. आणि त्यानंतर आता येस बँकेवर देखील निर्बंध लागल्याने खातेदारांना आता चिंता वाटू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -