घरमुंबईशाळकरी मुलीवर तीन नराधमांचा बलात्कार

शाळकरी मुलीवर तीन नराधमांचा बलात्कार

Subscribe

भिवंडीत कामगार महिलेवर मालकाचा अत्याचार

सावत्र आईच्या जाचाला कंटाळून 10 वीत शिकणारी 15 वर्षीय युवती दिल्ली येथील आतेबहिणीकडे जाण्यासाठी उत्तर प्रदेशमधील महागावा रेल्वे स्टेशनवर आली असता रेल्वे चौकीदाराने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याच्या तावडीतून सुटलेल्या युवतीला बलात्कार करणार्‍या चौकीदाराच्या दोघा मित्रांनी आधार देण्याच्या बहाण्याने दोन दिवस खोलीत डांबून पुन्हा अमानूष अत्याचार केला. त्यानंतर यातील एका नराधमाने या युवतीला गोदान एक्स्प्रेसने भिवंडीतील मित्राकडे आणून तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी समोर आली आहे, तर दुसरीकडे एका 30 वर्षीय कामगार महिलेवर कंपनी मालक व त्याच्या गाडी चालकाने अनेकदा बलात्कार केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या अत्याचारप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बबलू, इकरार, संतोष यादव या तिघा नराधमांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी सराईख्वाजा पोलीस ठाणे, उत्तर प्रदेश यांच्याकडे सीसीटीएनएस प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आला आहे.

दहावीत शिकणार्‍या 15 वर्षीय युवतीला तिच्या सावत्र आईचा जाच असह्य झाल्याने तिने दिल्लीतील आतेबहिणीकडे जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. तिने पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन गाठले. त्यावेळी पीडिता रेल्वे चौकीदार बबलू याच्याकडे दिल्लीकडे जाणार्‍या ट्रेनबाबत विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला चौकीच्या आतमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या तावडीतून सुटका झाल्यावर इकरार आणि संतोष यादव या दोघांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने भंडारी रेल्वे स्टेशन लगतच्या एका भाड्याच्या खोलीत कोंडून ठेवून दोन दिवस तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर संतोष यादव याने जौनपूर रेल्वे स्टेशनवरून पीडित मुलीला बळजबरीने गोदान एक्स्प्रेसमध्ये बसवून कल्याण येथे उतरवून बुधवारी शांतीनगर येथे राहणारा मित्र सोहराब सरबतवाला याच्या घरी आणले होते. मात्र, मुलीच्या सोबत असलेला तरुण हिंदू आणि मुलगी मुस्लीम असल्याचे शेजार्‍यांच्या निदर्शनास आल्याने याची खबर शांतीनगर पोलिसांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुलीची चौकशी केली. त्यावेळी मुलीने आपबीती कथन केली असता पोलिसांनाही धक्काच बसला. पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केल्याने बलात्काराची घटना समोर आली. पोलीस चौकशीसाठी आल्याची कुणकूण लागताच संतोष यादव आणि त्याचा मित्र सोहराब सरबतवाला हे दोघेही फरार झाले आहेत. पीडित मुलीला न्यायालयाच्या आदेशाने भिवंडीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून उत्तर प्रदेश पोलीस भिवंडीत पोहचल्यावर त्यांच्या ताब्यात मुलीला सुपूर्द करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी दिली आहे.

- Advertisement -

तसेच माणकोली,अंजूरफाटा रोडवरील महावीर कंपाऊंडमध्ये धाग्याच्या कंपनीत काम करणार्‍या 30 वर्षीय कामगार महिलेवर मालक आणि त्याच्या गाडी चालकाने अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी कंपनी मालक सुभाष गोपाल मालुसरे ( 40 रा.गौतम नगर, कुर्ला (प. ) आणि चालक संतोष जाधव उर्फ बाबू ( 35 रा. कुर्ला ) या दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी अंजूरगांव येथील महिला कंपनीत काम करीत असताना तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन तिला कळवा येथील लॉजवर व कंपनीतील एका रूममध्ये नेवून अत्याचार केला. या दोघांचा नेहमीच अत्याचार वाढल्याने अखेर पीडित महिलेने नारपोली पोलीस ठाणे गाठून कंपनी मालक व त्याच्या चालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच दोघेही फरार झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -