घरमुंबईमहापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ई-सिगारेटचे व्यसन!

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ई-सिगारेटचे व्यसन!

Subscribe

'सलाम बॉम्बे' या संस्थेने २०१८ च्या अभ्यास अहवालातून महापालिकेतील शाळकरी विद्यार्थी हे 'ई-सिगारेट' या व्यसनाच्या अधीन गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यसनमुक्तीसाठी विविध पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालूच आहेत. मात्र दुसरीकडे मुंबई शहर-उपनगरात असणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ई- सिगारेटचे व्यसन असल्याचे उघड झाले आहे. धुम्रपानाचा आधुनिक प्रकार असलेली ही ई-सिगारेट आहे. ही ई-सिगारेट ऑनलाईन पद्धतीने सहजरित्या उपलब्ध होत आहेत. शाळकरी मुले व्यसन म्हणून नाही तर एक फॅशन म्हणून या ई-सिगारेट ओढत आहेत. ‘सलाम बॉम्बे’ संस्थेने केलेल्या अभ्यास अहवालातून हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. शालेय वयाच्या मुलांच्या या व्यसनांमुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. ‘सलाम बॉम्बे’ या संस्थेने २०१८ साली केलेला अभ्यास हा मुंबई शहर-उपनगरातील ४० महापालिका शाळांमधील अहवाल आहे.

का पितात मुले इ-सिगारेट?

‘सलाम बॉम्बे’ या संस्थेने महापालिका शाळांमधील सातवी, आठवी आणि नववीच्या ४ हजार ३०२ विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातूनच हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. एकूण विद्यार्थ्यांपैकी ३४ टक्के विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची तयारी दर्शविली. या ३४ टक्क्यांमध्ये १४ टक्के विद्यार्थिनींचा तर २० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ई-सिगारेट ओढण्याचे कारण त्या विद्यार्थ्यांना विचारले असता, ४३.७ टक्के विद्यार्थ्यांनी ‘सामाजात स्टेटस सिम्बॉल म्हणून हे व्यसन करतो’ असे सांगितले. २८.८ टक्के विद्यार्थ्यांना या व्यसनातून आनंद मिळतो असे सांगितले. ९.३ टक्के विद्यार्थी कुतुहलापोटी, ७ टक्के विद्यार्थी ताण दूर करण्यासाठी आणि ६ टक्के विद्यार्थी हे कंटाळा येतो म्हणून या व्यसनाच्या अधीन गेल्याचे या आहवालातून उघड झाले आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांशी बोलत असताना एका आठवीतल्या विद्यार्थिनीने असे सांगितले की, माझ्या घरातून मला पॉकेटमनी म्हणून खूप पैसे मिळतात. त्यातूनच ५०० रुपयांत जवळच्या दुकानातून ही सिगारेट विकत घेतो. ही सिगारेट मुलाला विकत घेण्यास सांगितले असून त्यानंतर एकत्रपणे याचा आनंद घेत असल्याचे तिने म्हटले.

ई-सिगारेट म्हणजे नेमकं काय?

ई-सिगारेट ही इलेक्ट्रॉनिक सिगारेट आहे. याचा धूर होत नाही. यामध्ये निकोटिन हे तंबाखूत असलेले द्रव्य समाविष्ट आहे. ही सिगारेट बॅटरीवर सुरु होते. ही सिगारेट ओढताना द्रव्यरुपी निकोटिनचे वाफेत रुपांतर होते, मग ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -