घरमनोरंजन'कॉलेज डायरी' चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खडतर प्रवास

‘कॉलेज डायरी’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा खडतर प्रवास

Subscribe

दिग्दर्शकाच्या खडतर प्रवासातून 'कॉलेज डायरी'हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मनोरंजन क्षेत्रात आपण कसे उंचावर पोहोचणार यासाठी प्रत्येक कलाकार हा धडपडत असतो. त्यातलाच एक म्हणजे अनिकेत जगन्नाथ घाडगे. ‘कॉलेज डायरी’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने त्याचं स्वप्न तर प्रत्यक्षात साकारलंच, पण त्यामागील प्रवास प्रचंड कष्टप्रद आहे. दिग्दर्शनाची दोर हाती घेत सगळं युनिट सांभाळणं ही साधी गोष्ट नसून वेळोवेळी पदरमोड करीत या चित्रपटाला त्याने सांधलं. प्रसंगी आईचे आणि बहिणीचे दागिने गहाण ठेवत, तर कधी व्याजावर पैसे घेत त्याने या चित्रपटासाठी निर्माते भावेश काशियानी यांनाही पाठिंबा दिला. काहींनी अचानक माघार घेतल्यामुळे दिग्दर्शक अनिकेतची जबाबदारी आणखी वाढली होती. कात्रीत सापडल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. एकीकडे चित्रपटाचे दिग्दर्शन तर दुसरीकडे चित्रपटासाठी लागणारा फायनान्स अशी अवस्था होती. अशा परिस्थितीतही अनिकेत न डगमगता आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने जातच राहिला.

दुखापत होऊनही काम सुरूच राहिलं!

चित्रपटाची शूटिंगच्या दरम्यान त्याच्या पाठीला दुखापतही झाली. या गोष्टीचा बाऊ न करता त्याने चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खंड पडू दिला नाही. ध्येयवेड्या महत्त्वाकांक्षी अनिकेतला त्याचे स्वप्न साकार करण्यापासून कुणीच अडवू शकत नव्हतं हे त्याने ‘कॉलेज डायरी’ चित्रपटाद्वारे सिद्ध केले आहे. अडचणींचा डोंगर पार करत झालेला अनिकेतच प्रवास इथेच थांबत नाही तर आत्ता चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून त्याच्या या प्रयत्नांना प्रेक्षकसुद्धा पसंतीची पावती देतील यात काही शंका नाही.

- Advertisement -

काही अनपेक्षित घटनांची कथा

‘कॉलेज डायरी’ या चित्रपटाची कथाही कॉलेज जीवनावर आधारित आहे. कॉलेज म्हणजे केवळ मजा-मस्ती-धम्माल करण्यासाठीच आहे असे समजणाऱ्या मित्रांच्या आयुष्यात काही अनपेक्षित घटना घडतात याभोवती अनिकेतने आपली कथा गुंफली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, शिवराज चव्हाण, शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम आदी कलाकार आहेत.

गाणी आवडली, पण चित्रपटाचं काय होणार?

चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. मराठी सिनेसंगीत क्षेत्रात नवा विक्रम करणारा ‘कॉलेज डायरी’ पाच भाषांतील गाण्यांमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाचही भाषांमधील सोशल पोर्टल्सवरील चित्रपटाची गाणी साऱ्यांच्याच ओठी रुळली आहेत. हा चित्रपट १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या गाणांना प्रेक्षकांनी जसा चांगला प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद प्रेक्षक प्रत्यक्ष चित्रपटालाही देतील का? हे लवकरच कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -