घरमुंबईविद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावरच !

विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावरच !

Subscribe

मुंबईतील रस्त्यांवर धावणार्‍या स्कूल व्हॅन पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहेत. स्कूल व्हॅनच्या नावावर अनेक खासगी व्हॅन विद्यार्थ्यांची ने आण करत आहेत. विद्यार्थ्यांची ने आण करताना त्यांची सुरक्षा मात्र धाब्यावर बसविली जात आहेत.

मुंबईतील रस्त्यांवर धावणार्‍या स्कूल व्हॅन पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहेत. स्कूल व्हॅनच्या नावावर अनेक खासगी व्हॅन विद्यार्थ्यांची ने आण करत आहेत. विद्यार्थ्यांची ने आण करताना त्यांची सुरक्षा मात्र धाब्यावर बसविली जात आहेत. यातील अनेक स्कूल व्हॅनना फिटनेस प्रमाणपत्र नसताना रस्त्यांवर सरार्सपणे धावताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले असताना वाहतूक विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवर धावणार्‍या स्कूल बससाठी राज्य सरकारतर्फे विशेष धोरण जाहीर करण्यात आले आहेत. हे धोरण जाहीर करताना विद्यार्थ्यांची ने आण करताना स्कूल बस चालकांनी घ्यावयाच्या सुरक्षितेच्या उपाय योजना राबविण्याची स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळेस स्कूल व्हॅनसाठी अद्याप कोणतीही नियम जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू असून यासाठी न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. तर मुंबईत आणि राज्यात काही दिवसांपूर्वी स्कूल व्हॅनच्या अपघातांनी डोके वर काढल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. तर मुंबई उच्च न्यायालयाने नव्याने स्कूल व्हॅनला फिटनेस प्रमाणपत्र न देण्याची सूचना करतानाच नियमांचे उल्लंघन करणार्‍या स्कूल व्हॅनवर फक्त दंडात्मक कारवाई न करिता त्या ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

मात्र, त्यानंतरही मुंबईतील रस्त्यांवर या स्कूल व्हॅन सरार्सपणे धावताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, या स्कूल व्हॅनमध्ये अनेक स्कूल व्हॅन हे खासगी वाहनांच्या माध्यमातून केली जात आहे.यावेळी अनेक व्हॅनमध्ये दहाहून अधिक विद्यार्थी बसविले जात असून अनेक स्कूल व्हॅनमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षितेसाठी इतर कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. तर मुंबईतील रस्त्यांवर धावणार्‍या अनेक स्कूल व्हॅन या सीएनजीवर चालणार्‍या आहेत. ज्यात अग्निशमन यंत्रणा देखील नसून अनेक व्हॅनमध्ये प्रथमोपचाराचे साहित्य देखील उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

शाळा प्रशासनाचे हात वर

दरम्यान, स्कूल व्हॅनबाबत शाळा प्रशासन कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. तर तक्रारीदेखील ऐकून घेत नाहीत. स्कूल व्हॅनशी आमचा संबंध नसून फक्त स्कूल बसेससंदर्भातील तक्रार शाळा प्रशासन घेत आहेत.

- Advertisement -

कराराच्या प्रश्नाला ठेंगा

नियमानुसार विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शाळा प्रशासनाशी करार करणे गरजेचे असते. मात्र, मुंबईतील रस्त्यांवर धावणार्‍या स्कूल व्हॅन आणि शाळांशी कोणताही करार नसताना देखील ते विद्यार्थ्यांची ने आण करत आहेत.

पिवळा रंग मारून धावतात गाड्या

स्कूल व्हॅन चालकांकडून सध्या फक्त त्यांच्या गाड्यांना पिवळा रंग मारून गाड्या वापरल्या जात आहेत. अनेक गाड्यांना १२ वर्षे पूर्ण झालेली असतानादेखील या मुंबईतील रस्त्यांवर धावत असल्याची तक्रार स्कूल बस चालकांकडूनच करण्यात येत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून आम्ही याविरोधात तक्रार करत आहोत, पण वाहतूक विभाग कोणतीही कारवाई करत नाही. आजही मुंबईच्या रस्त्यांवर कोणतीही गाडी स्कूल व्हॅन म्हणून धावत आहे. उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले असतानादेखील का कारवाई केली जात नाही, हा प्रश्न गंभीर आहे. याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे.
– अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -