घरमुंबईअॅन्टॉप हिलमध्ये संरक्षक भिंत कोसळली; दुर्घटनेत १० ते १५ गाड्यांचे नुकसान

अॅन्टॉप हिलमध्ये संरक्षक भिंत कोसळली; दुर्घटनेत १० ते १५ गाड्यांचे नुकसान

Subscribe

मुंबईतील वडाळामध्ये संरक्षक भिंत खचल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी १० ते १५ गाड्यांचे नुकसान झाले आहे.

मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू असून वडाळ्यातील अॅन्टॉप हिल परिसरामध्ये संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अॅन्टॉप हिल परिसरात मध्यरात्री २ ते ४ वाजता ही घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, १० ते १५ गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे. अॅन्टॉप हिल येथे लॉयल इस्टेट आणि दोस्ती एकर्स या दोन बिल्डींगच्या मधल्या भागामध्ये पार्कींगचे काम सुरू होती. दोस्ती बिल्डर्सकडून यावेळी जपळपास १९ मीटर खोल खोदकाम सुरू होते. त्यावेळी जमीन खचली आणि संरक्षक भिंत कोसळल्याने गाड्यांचे नुकसान झाले. शिवाय कन्स्ट्रकसन साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या झोपड्यांचे देखील नुकसान झाले. यासंदर्भात काही स्थानिकांनी बिल्डरला दुर्घटना होऊ शकते असा इशारा दिला होता. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पेडर रोड येथे झाड कोसळले

मुंबईतील पेडर रोड येथे पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाड कोसळले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, बाबुलनाथ बस थांब्यावर झाड कोसळल्याने बस थांब्याचे मात्र नुकसान झाले. शिवाय, रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाली.

- Advertisement -
tree collapsed in pedar road
पेडर रोडवरील बाबुलनाथ बस थांब्यावर झाड कोसळले

 

मुंबईमध्ये जोरदार

मुंबईमध्ये पावसाची जोरदार बँटींग पाहायाला मिळत आहे. जोरदार पावसाचा परिणाम हा रेल्वे आणि बस वाहतुकीवर देखील झाला आहे. दादर, सायन, कुर्लामध्ये रेल्वे ट्रकवर पाणी साचल्याचे चित्र आहे. शिवाय तिनही रेल्वे मार्गाच्या वाहतूक ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. शिवाय राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर पाहायाला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -