घरमुंबई१६ गुन्हे केलेल्या सिरीअल रेपिस्टला अखेर अटक

१६ गुन्हे केलेल्या सिरीअल रेपिस्टला अखेर अटक

Subscribe

नवी मुंबई आणि नालासोपारामध्ये १६ अल्पवयिन मुलींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचने मीरारोड येथून आरोपीला अटक केली आहे.

नवी मुंबई, ठाणे, नालासोपारा या ठिकाणी दहशद निर्माण करणारा सिरीयल रेपिस्टच्या मुसक्या अखेर नवी मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. बुधवारी मीरा रोड येथील शीतलनगरमधून आरोपीला अटक करण्यात आले. रेहान अन्सारी असं या आरोपीचे नाव असून गेले अनेक दिवस त्याच्या विरोधात पोलिसांनी मोहीम सुरु केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबई आणि नालासोपारा पोलिसांच्या रडारवर असलेल्या या आरोपीवर २०१६ पासून अल्पवयिन मुलींवर बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी १६ गुन्हे दाखल आहेत.

अल्पवयिन मुलींना करत होता टार्गेट

आरोपी रेहान अन्सारी हा २४ ते २८ या वयोगटात असल्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात नवी मुंबई आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे केल्याची नोंद आहे. त्याचसोबत त्याने आतापर्यंत ९ अल्पवयिन मुलीवर बल्कार आणि ७ अल्पवयिन मुलींचा लैगिंग छळ केला आहे. तसंच आरोपी मराठी आणि हिंदी भाषेत बोलत असल्याची नोंद पोलिसांनी केली होती. गेल्या १८ महिन्यापासून नवी मुंबई क्राईम ब्रँचची २५ पोलिसांची टीम या रेपिस्टच्या शोधात होती.

- Advertisement -

दोन वर्षात १६ गुन्हे दाखल

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांनुसार, आरोपीविरोधात पहिला गुन्हा ऑक्टोबर २०१६ मध्ये दाखल करण्यात आला होता. वाशीमध्ये त्याने १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर एप्रिल २०१७ पर्यंत आरोपीने १४ मुलींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. दोन प्रकरणात मिळालेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हाच आरोपी दिसत होता. दीड वर्षानंतर नवी मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आले की, सर्व प्रकरणात हाच आरोपी आहे.

अशी करायचा मुलींची फसवणुक

तपासातून हे समोर आले की, आरोपी पीडित किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना खोटे बोलून त्यांची फसवणुक करायचा. काही प्रकरणामध्ये आरोपीने पीडित मुलींना सांगायचा की, तुमच्या वडीलांनी दुकानावरुन सामान आणायला सांगितले आहे, गॅस सिलेंडर आला असू जवळच थांबलेल्या रिक्षातून घेण्यास सांगितले आहे असे सांगून या मुलींना तो फसवायचा. त्यानंतर या मुलींना तो बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगमध्ये किंवा निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. काही पीडित मुलींशी गप्पा मारून त्यांना तो तुझ्या कपड्यांवर विषारी औषध सांडले असल्याचे सांगून त्यांना घाबरवू कपडे काढण्यास भाग पाडायचा. तर काही प्रकरणामध्ये मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने त्यांच्यावर बलात्कार करायचा.

- Advertisement -

आरोपी गुरुवारी करायचा बलात्कार

नवी मुंबई पोलिसांच्या सांगण्यानुसार, संशयित आरोपीवर जे गुन्हे दाखल झाले होते ते गुरुवारच्या दिवशी झाले होते. हे पोलिसांना त्यावेळी कळाले जेव्हा पोलिसांनी या आरोपीविरोधात दाखल झालेल्या १६ प्रकरणांच्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. आरोपीविरोधात सहा गुन्हे गुरुवारच्या दिवशी दाखल झाले होते आणि दोन ते तीन गुन्हे आठवड्याच्या इतर दिवशी दाखल झाले होते. यावरुन पोलिसांनी अंदाज काढला की, आरोपी कुठेतरी नोकरी करत असेल आणि त्याला आठड्याची सुट्टी गुरुवारच्या दिवशी असेल. आरोपीविरोधात दीड ते दोन महिन्यांमध्ये एक तरी गुन्हा दाखल असायचाच. आता दोन महिन्यापूर्वी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने आणखी बलात्कार केले असतील मात्र पीडित ठाण्यापर्यंत आले नसतील असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपीला अटक करणे मोठे आव्हान होते

या बलात्कार प्रकरणांमध्ये नऊ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी कैद झाला होता. यामधील फक्त चार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत होता. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे दिसत होते की आरोपी प्रत्येक वेळेला केसांची आणि दाढीची स्टाईल बदलायचा. यामधील बऱ्याच फूटेजमध्ये आरोपीने दाढीचा फ्रेंचकट केला होता तर काही यामध्ये त्याने संपूर्ण दाढी काढून टाकली होती. तो प्रत्येक वेळी त्याच्या हेअर स्टाईल चेंज करायचा. या सगळ्या सीसीटीव्ही फूटेच्या आधारावच पोलिसांनी शेवटी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -