घरमुंबईअल्ववयीन मुलीवर शाळेत लैगिंक अत्याचार

अल्ववयीन मुलीवर शाळेत लैगिंक अत्याचार

Subscribe

मालाड येथील धक्कादायक घटना

शाळेतच एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. दरम्यान या घटनेने संतप्त झालेल्या मुलीच्या पालकांसह इतरांनी शाळेसमोरच शुक्रवारी जोरदार घोषणाबाजी करुन आरोपीच्या अटकेची मागणी केली होती.

पिडीत सहा वर्षांची मुलगी मालाड परिसरात राहते. याच परिसरातील एका आंतरराष्ट्रीय शाळेत ती सध्या पहिलीत शिकते. शाळेच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर तिचा वर्ग आहे. गुरुवारी दुपारी ती बाथरुममध्ये गेली होती. यावेळी तिच्यासोबत एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सायंकाळी साडेसहा वाजता ती घरी आली, ती कोणाशी काहीच बोलत नव्हती. त्यामुळे तिच्या पालकांनी तिची विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तिच्या पालकांसह इतर पालकांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी शाळेच्या गेटजवळ मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती.

- Advertisement -

ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मालवणी पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शाळेचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र फुटेजमधून कोणीही व्यक्ती दिसून येत नाही. दरम्यान, दुपारी शाळेत ही घटना घडली त्यावेळी कोणीही या व्यक्तीला पाहिले नाही. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -