घरक्रीडाविजय क्लब, गोल्फादेवी उपांत्यपूर्व फेरीत

विजय क्लब, गोल्फादेवी उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

मुंबई शहर जिल्हा निवड चाचणी कबड्डी

विजय क्लब, अंकुर स्पोर्ट्स, गोल्फादेवी या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील प्रथम श्रेणी पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत विजय क्लबचा सामना गोल्फादेवीशी, एस.एस.जीचा सामना अंकुर स्पोर्ट्सशी, बंड्या मारुतीचा सामना जय भारतशी, तर विजय बजरंगचा सामना गुड मॉर्निंग संघाशी होईल.

नायगावमधील भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील स्थानिक प्रथम श्रेणी पुरुषांच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत विजय क्लबने अमर भारत क्रीडा मंडळावर ४८-३३ अशी मात करत स्पर्धेत आगेकूच केली. या सामन्याच्या मध्यंतराला विजय क्लबकडे २८-२० अशी आघाडी होती. त्यांच्याकडून अजिंक्य कापरे, सिद्धांत बोरकर, विजय दिवेकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. गोल्फादेवीने एकता संघाचा ४३-२७ असा पराभव केला. गोल्फादेवीच्या या विजयात धनंजय सरोज, तुषार दूडये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

पंकज मोहिते, आकाश चव्हाण यांच्या अप्रतिम चढाई-पकडीच्या खेळामुळे एस.एस.जी फाउंडेशनने जय दत्तगुरु कबड्डी संघाला ३६-२६ असे पराभूत केले. या सामन्याच्या मध्यंतराला एस.एस.जीकडे १९-१६ अशी अवघ्या तीन गुणांची आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात त्यांनी अधिक आक्रमक खेळ करत हा सामना जिंकला. बंड्या मारुतीने वेसली स्पोर्ट्सचा ३९-२७ असा पराभव केला. तसेच जय भारतने विजय नवनाथवर ३०-२० अशी, अंकुरने यंग प्रभादेवीवर ३०-१३ अशी, विजय बजरंगने अमरहिंदवर ३१-२५ अशी मात करत स्पर्धेत आगेकूच केली.

महिलांत शिवशक्ती अ संघ बाद फेरीत

महिलांच्या अ गटातील साखळी सामन्यात शिवशक्ती अ संघाने महर्षी दयानंदचा ४७-१४ असा पराभव करत बाद फेरी गाठली. त्यांच्या या विजयात पूजा यादव, ऋणाली भुवड, पौर्णिमा जेधे चमकल्या. ब गटात मुंबई पोलीस संघाने जिजामाता संघाला २८-१९ असे नमवत बाद फेरीत प्रवेश केला. क गटात अमरहिंदने गोल्फादेवीचा ६२-२८ असा धुव्वा उडवला. ड गटात डॉ. शिरोडकरने ओम ज्ञानदीपला ५१-१० असे पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -