घरमुंबईपाली पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांना निवारा

पाली पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांना निवारा

Subscribe

पोलीस म्हटला की तो सदैव सेवेत मग्न अशी प्रतिमा समोर येते. त्यामुळे प्राणीमात्रांना भूतदया दाखविणे राहिले दूर! मात्र व्यस्त वेळेतूनही थोडा वेळ काढत येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी उन्हाळ्यात पक्ष्यांची दाणा-पाण्यासाठी होणारी तगमग लक्षात घेऊन ठाण्याच्याच आवारात एक अनोखा उपक्रम राबविला आहे.

रणरणत्या उन्हाचा फटका संपूर्ण जीवसृष्टीलाच बसत आहे. उन्हाचा वाढता दाह आणि तापमानात होणारी कमालीची वाढ प्राणीमात्रांच्या जीवावर बेतत असते. उन्हाच्या काहिलीने पक्षी, प्राण्यांच्या दाण्या-पाण्याचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शिंदे यांनी पुढाकार घेत चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात पशुपक्ष्यांच्या दाण्या-पाण्याची उत्तमरित्या व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

पक्ष्यांसाठी झाडावर घरटी बनविण्यात आली असून, तेथे त्यांना उन्हापासून रक्षण करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे एका ठराविक पद्धतीने काम चालणार्‍या पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. विशेष म्हणजे त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण केले गेले आहे. पाण्याचीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.

शिंदे यांनी येथील पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यापासून त्या ठिकाणचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्यात त्यांनी कल्पकतेबरोबर भूतदया दाखवत राबविलेल्या एका सुंदर उपक्रमाची सध्या शहरात चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -