घरताज्या घडामोडीराज कुंद्रा काय काम करायचे हे मी कधी त्याला विचारत नव्हते--शिल्पा शेट्टी

राज कुंद्रा काय काम करायचे हे मी कधी त्याला विचारत नव्हते–शिल्पा शेट्टी

Subscribe

मी माझ्या कामात बिझी होते. यामुळे मी त्याला तू काय काम करतोस हे कधी विचारत नसल्याचे आणि तो सांगत नसल्याचे शिल्पाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

राज कुंद्रा पॉर्नेाग्राफी प्रकरणासंदर्भात मुंबई क्राईम ब्रांचने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा २३ जुलै रोजी जबाब नोंदवला आहे. . यावेळी शिल्पाने मी आपल्याच कामात इतकी बिझी असायचे की आपला पती राज कुंद्रा काय काम करतो याबद्दल कधी त्याला विचारलचं नसल्याचे तिने सांगितल आहे. तसेच यावेळी तिने हॉटशॉट अॅपबद्दल काहीही माहिती नसल्याचेही तिने म्हटल्याचे समोर आलं आहे. एका वृत्तवाहीनीने शिल्पाने पोलिसांना दिलेल्या जबाबाची माहिती दिली आहे.

शिल्पाने पोलिसांना दिलेल्या जबाबात पती राज कुंद्रा याच्या कंपनीबद्दल सांगितले. यावेळी शिल्पाने २०१९ रोजी पती राज कुंद्राने Armsprime मीडिया कंपनी सुरू केल्याचं सांगितले. सौरव कुशवाहा हा कुंद्राचा पार्टनर होता. तसेच ही कंपनी पूनम पांडे सारख्या एक्सपोज करणाऱ्या कलाकारांचे शॉर्ट व्हिडीओ बनवायची . ज्यात कलाकार स्वत;च्या मर्जीने एक्सपोज करायच्या. याबद्दल मी राजला विचारले असता ओटीटीवर अशा शॉर्ट फिल्म चांगल्या चालत असल्याचे व त्यात फायदा होत असल्याचे त्याने मला सांगितल्याचं शिल्पाने पोलिसांना सांगितले. त्याचबरोबर कामत मात्र गहना वशिष्ठबरोबर पॉर्न व्हिडीओ बनवतो आणि विकतो. असेही कुंद्राने आपल्याला सांगितल्याचे शिल्पाने पोलिसांना सांगितले.  बॉलीफेम अॅप बद्दल आपल्याला काहीही माहित नसल्याचे शिल्पाने पोलिसांना सांगितले.

- Advertisement -

तसेच मला आताच कळालं की वियान इंडस्ट्रीजच्या माध्यमातून हॉटशॉट अॅप तयार करण्यात आले आहे. त्यावर पॉर्न व्हिडीओ बनवण्यात येत होते. नंतर ते प्रदीप बक्शीच्या Kenrin कंपनीला विकले जात होते. मी माझ्या कामात बिझी होते. यामुळे मी त्याला तू काय काम करतोस हे कधी विचारत नसल्याचे आणि तो सांगत नसल्याचे शिल्पाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -