घरमुंबईगिरगावात शिवसेनेचं मेट्रोविरोधात आंदोलन

गिरगावात शिवसेनेचं मेट्रोविरोधात आंदोलन

Subscribe

मेट्रो ३ विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून सेना कार्यकर्त्यांकडून गिरगावात गाड्यांची तोडफोड केली जात आहे.

गिरगावात मेट्रो ३ विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन करत गाड्यांची तोडफोड केली आहे. गिरगावात सुरू असणाऱ्या मेट्रो ३ च्या विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना आक्रमक होती. पण, आज त्यांच्या रागाचा उद्रेक झाला आणि त्यांनी आंदोलन करत गाड्यांची तोडफोड केली आहे.

- Advertisement -

यामुळे करण्यात आले आंंदोलन

मेट्रोच्या कामांमुळे रस्त्याच्या बाजूला डंपर २४ तास सुरु असतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या उद्भवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डंपरमुळे अपघात देखील होतात. त्याचप्रमाणे आवाज आणि गोंगाटामुळे जगणं कठीण झालं आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत. तसेच जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा शिवसेना नेते पांडुरंग संपकाळ यांनी दिला आहे. या दगडफेकीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सकाळीच शिवसेनेचे कार्यकर्ते मेट्रो ३ च्या बाहेर आंदोलन करत होते. त्यानंतर तिथे उभे असलेल्या डी.बी. रिअॅलिटी डेव्हलपर्सच्या गाड्या फोडल्या. त्यामुळे, आता शिनसेनेने मेट्रो ३ विरोधात एल्गार पुकारल्याचं समोर आलं आहे.


हेही वाचा – ठरलं, भाजप मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -