घरताज्या घडामोडीकेडीएमसीच्या महासभेत शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी

केडीएमसीच्या महासभेत शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी

Subscribe

भाजप नगरसेविका आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी अनधिकृत बांधकाम आणि प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सभा तहकुबी दाखल केली होती.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मंगळवरच्या महासभेमध्ये शिवसेना- भाजपमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळाली. भाजप नगरसेविका आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी अनधिकृत बांधकाम आणि प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सभा तहकुबी दाखल केली होती. त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. यावेळी भाजपने शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपच्या उपेक्षा भोईर यांनी प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांच्यावर प्रशासनाने कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. परंतु त्यावरूनच भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांविरोधातील जंगी कलगीतुरा सुरू झाला. एकीकडे भाजप सदस्य आणि दुसरीकडे शिवसेना सदस्य अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सभागृहात झडत होत्या. तर याप्रकरणी त्यादरम्यान महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दोन वेळा निवेदनही केले. ज्यावर उपेक्षा भोईर यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तर त्यानंतर पीठासीन अधिकारी महापौर विनिता राणे यांनी याप्रकरणी दिलेल्या निर्देशांवर भाजपने आक्षेप घेत महासभेतून सभात्याग करत सभागृहाच्या पायऱ्यावर बसून शिवसेनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपने शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपेक्षा भोईर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तिखट शब्दांत हल्ला चढवला. शिवसेना भ्रष्ट अधिकारी आणि अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा पुनरुच्चार करत पुन्हा एकदा शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -