घरमुंबईबाळासाहेबांची जयंती,शिवसेनेकडून जल्लोष सोहळ्याचं आयोजन!

बाळासाहेबांची जयंती,शिवसेनेकडून जल्लोष सोहळ्याचं आयोजन!

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिलीच बाळासाहेबांची जयंती. त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. याशिवाय राज्यभरातून शिवसैनिक आणि पदाधिकारी येणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील मंत्रीही हजेरी लावणार आहेत. तर दुसरीकडे बिकेसी इथे शिवसेना जल्लोष सोहळा आयोजित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार सोहळा शिवसैनिकांकडून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन शिवसैनिकांकडून करण्यात आलं आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशातच आज शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 94व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांकडून वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर भव्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन ट्वीट केले आहेत. आपल्या एका ट्वीटमधून बाळासाहेबांना आदरांजली वाहणारा व्हिडीओ त्यांनी ट्वीट केला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -