उल्हासनगरमध्ये एसटीखाली चिरडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

उल्हासनगर मधील छोटू प्यारेलाल प्रजापति (१५) या दहावीतील शाळकरी विद्यार्थाचा बसखाली चिरडला जाऊन मृत्यू.

school boys death stuck in bus
शाळकरी विद्यार्थाचा मृत्यू

आज सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसखाली चिरडला गेल्याने दाहावीत शिकणाऱ्या प्यारेलाल प्रजापति (१५) या शाळकरी विद्यार्थाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात मृतपावलेला छोटू प्रजापति हा उल्हासनगर ५ येथील आझादनगर परिसरात नातेवाईकां सोबत राहत होता. तर उल्हासनगर ३ च्या भारती हिंदी विद्यालयात तो दहावीत शिकत होता. या घटनेनंतर उल्हासनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमका कसा झाला अपघात

आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास तो शाळेत सायकलवरून जात होता. तो व्हीनस चौकात आलेला असतांना समोरून भरधाव वेगाने एसटी महामंडळाची बस येत होती. बसचालक विपुल वझडे (३१) याचा वाहनारील ताबा सुटला. त्यामुळे वाहनाच्या मागच्या चाखाखाली येऊन छोटू प्रजापति चिरडला गेला आणि जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलीसांनी माहिती मिळताच तात्काळ धावघेत पंचनामा केला. यानंतर मृत छोटूचे आई-वडील आणि शाळेला घटनेची माहिती दिली.

बसचालकावर गुन्हा दाखल

आरोपी बसचालक वझडे एम.एच १४ बी.टी ३८७३ ही एसटी महामंडळाची बस अंबरनाथ वरून कळंबोली कडे घेऊन जातांना हा अपघात घडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान घटनाघडल्यानंतर बसचालक वझडे यांनी स्वतला पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक मंगेश जाधव आणि आर.पाटील करत आहेत. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. महानगरातील वाहनांच्या गर्दीत लहान मुलांना सायकलवरूण शाळेत जाण्यास पालकांनी मतजाव करावा असे अवाहन समाजसेवी संघटनांनी केल आहे.