घरमुंबई'सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं'; संजय राऊत यांचे ट्विटवरून संकेत

‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं’; संजय राऊत यांचे ट्विटवरून संकेत

Subscribe

एकीकडे प्रसार माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू मांडताना संजय राऊत मुख्यमंत्री सेनेचाच होईल, असा आशावाद दर्शवत असताना दुसरीकडे ट्विटरच्या माध्यमातून मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए, असे संकेत देत आहेत. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी कवी दुष्यंत कुमार यांची कविता त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली असून बदलाचे जणू संकेतच दिले आहेत. संजय राऊत सातत्याने शिवसेनेकडे बहुमत सिद्ध करण्याइतके संख्याबळ असल्याचे सांगत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकारण बदलाच्या मार्गावर असून, लवकरच ते दिसेल, असेही ते म्हणाले होते. त्यातच सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचा मावळते मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. त्यामुळे संजय राऊत अप्रत्यक्षरित्या नव्या आघाडीचे संकेत तर देत नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होणार असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा पुनरुच्चार केला होता. यावेळी त्यांनी ग्रहण सुटेल आणि शपथग्रहण होणारच, असा दावाही केला. राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या तिढ्यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे त्यांच्या बोलण्यावरून पाहायला मिळाले. सध्या राज्यात आणि दिल्लीतही सत्ता स्थापनेवरून खलबत सुरु आहेत. भाजप-सेनेकडून कोणतीच ठोस भूमिका मांडली जात नसताना, संजय राऊत मात्र शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा आशावाद दर्शवत आहेत.

हेही वाचा –

अयोध्या निकालाप्रकरणी जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -