घरमुंबईशिवसेना खासदारांची बैठक रद्द

शिवसेना खासदारांची बैठक रद्द

Subscribe

संसदेचं अधिवेशन, त्यात मांडण्यात येणारी महत्त्वाची विधेयकं तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता होती.

सध्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. पण काही कारणास्तव ही बैठक रद्द करण्यात आली आहे. यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान संसदेचं अधिवेशन, त्यात मांडण्यात येणारी महत्त्वाची विधेयकं तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता होती.

विधानसभा निवडणूक २०१९ नंतर राज्यात सत्तापरिवर्तन पहायला मिळाले. भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. राज्यातील सत्ता परिवर्तनामुळे केंद्रातील सत्ता समीकरणावर सुद्धा परिणाम झाला. दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार महत्त्वाची विधेयकं आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून मुंबईत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष – आशिष शेलार

खातेवाटपावर चर्चा?

दरम्यान निवडणुकी निकालाच्या तब्बल महिनाभरानंतर राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. असे असले तरी अद्याप खाते वाटप झालेले नाही. खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीत एकमत झालेले नाही.

शिवसेनेची गृहमंत्रिपदाची मागणी

आतापर्यंत गृहमंत्रीपदाची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांकडे असल्यानेच उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहमंत्रीपद सोपवण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. पण शिवसेनेच्या या मागणीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

भाजपची वसंतस्मृतिमध्ये बैठक

दरम्यान भाजपची सुद्धा आज वसंतस्मृतिमध्ये बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रमाबरोबर मुंबईच्या २२७ वॉर्डचे अध्यक्ष, ३६ विधानसभा पक्षाचे अध्यक्ष तसेच ६ लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष यांची येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्ती यावर चर्चा होणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -